वय-वर्ष  १९ ,२० …. अन् न्यायालयाची ‘लिव्ह-इन’ ची परवानगी 

अहमदाबाद :वृत्तसंस्था

न्यायालये बहुतेक वेळा प्रेमवीरांच्या पाठीमागे ठाम उभे राहताना पाहायला मिळत आहेत. गुजरात मधील अशाच एक प्रेमीयुगलाला गुजरातच्या उच्च न्यायालयाने लग्नापूर्वी एकत्र (लिव्ह-इन-रिलेशनशिप) राहण्याची परवानगी दिली आहे. विशेष म्हणजे यात प्रियकराचे वय १९ तर प्रेयसीचे वय २० वर्ष आहे. प्रियकराने न्यायलायकडे एकत्र राहण्याची परवानगी मागितली होती.
[amazon_link asins=’B077PWBC7J’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’17f587cb-971e-11e8-9380-f51dd5e40397′]

या प्रकरणात न्यायालयाने म्हटले की, तरुणी १८ वर्षापेक्षा मोठी असल्याने ती सज्ञान असून तिला ज्या व्यक्तीसोबत राहायचे आहे, त्या व्यक्तीसोबत राहण्याचा तिला अधिकार आहे. तसेच तरुणीला ज्या ठिकाणी राहायचे असेल तिथे पोहचवायची जबाबदारी पोलिसांची असेल. तरुणीनं तिच्या कुटुंबासोबत  राहण्यास ठाम नकार दिला आहे.

हे प्रेमीयुगल वेगवेगळ्या समुदायाचे असल्याने कुटुंबीयांचा विरोध आहे. यापूर्वी दोघांनी पळून जाण्याचा प्रयत्नही केला होता. परंतु मुलीच्या कुटुंबीयांनी दोघांना शोधून काढले आणि तिला जबरदस्तीनं मुलापासून दूर ठेवले होते. यांनतर तरुणीच्या प्रियकरानं न्यायालयात लिव्ह-इन-रिलेशनशिपसाठी अर्ज केला होता. प्रेयसीला तिचे कुटुंबीय आपल्यापासून बळजबरी दूर ठेवत असून, तिला न्यायालयासमोर हजर राहण्याचे आदेश दिले जावेत, अशी विनंती प्रियकराने केली होती. प्रियकराने म्हटले की, मी अद्याप सज्ञान नसल्यामुळे लग्न करु शकत नाही. त्यामुळे आम्हाला लिव्ह-इन रिलेशनशिप मध्ये राहण्याची परवानगी द्यावी. न्यायालयाने या दोघांच्या बाजूने कौल दिला. त्यानुसार आता त्या दोघांना एकत्र राहण्याची परवानगी देण्यात आली आहे.