Pune News : वयाच्या 83 वर्षी रतन टाटा यांनी पुण्यातील आजारी सहकार्‍याची घेतली भेट

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – वयाच्या ८३ वर्षी रतन टाटा यांनी मुंबई ते पुणे प्रवास केला आणि नुकतीच त्यांनी त्यांच्या एका जुन्या सहकाऱ्याची भेट घेतली. गेल्या २ वर्षांपासून ते सहकारी आजारी होते. ही भेट अत्यंत खासगी होती, कोणताही मीडिया यावेळी इथे उपस्थित नव्हता. माणुसकी जपत आसपासच्या माणसांना नेहमीच भरभरून मदत केली आहे. यामुळे, रतन टाटा हे दयाळू आणि सहानभूतीशील व्यक्ती असल्याचे पुन्हा सिध्द झाले आहे.

रतन टाटा यांनी लोकांना सहकार्य केल्याच्या अनेक प्रसंग यापुर्वीही घडले आहेत. २६/११ च्या दरम्यान त्यांनी ८० सहकऱ्यांच्या कुटुंबाची स्वत: भेटी घेतल्या होत्या. त्यावेळी त्यांनी त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची संपुर्ण आणि आयुष्यभरासाठी संपुर्ण कुटंब आणि निर्भर व्यकींचा वैद्यकीय खर्च उचलत त्यांचीही जबाबदारी घेतली होती. तसेच पैशांची चिंता न करता त्यांना कर्ज माफी आणि ॲडव्हान्स दिले होते. रतन टाटा यांच्या दयाळूपणामुळे कित्येक कुटुंबाना कठीण प्रसंगी जगण्याची उमेद दिली आहे.

प्रख्यात उद्योगपती असूनही कसलीही प्रसिध्दी न करता ते आपल्या जुन्या सहकऱ्यांच्या घरी भेट देत त्यांची स्वत: विचारपुस करणे ही रतन टाटा यांची वर्षांनुवर्षांची जणू शैलीच आहे.