कंटेनरच्या धडकेत वृद्ध महिलेचा मृत्यू 

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन – वेगातील कंटेनरची जोरदार धडक बसल्याने एका वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू झाला. गुरुवारी (दि.21) दुपारी पावनेतीनच्या सुमारास आळंदी येथील माहेश्वरी भक्त निवासासमोरील प्रदक्षिणा रस्त्यावर हा अपघात घडला.

गंगुबाई रामचंद्र भीसे (५७ , रा. खोजापुरी, नगर) असे मयत भाविक महिलेचे नाव आहे. याप्रकरणी आळंदी पोलीसांनी कंटेनर चालकाला अटक केली असून ज्ञानेश्वर विष्णू बनसोडे (वय 23, रा. मुंबई पुलवाले धर्मशाळा, चाकण चौक, आळंदी) यांनी फिर्याद दिली आहे.

गुरुवारी दुपारी पावनेतीनच्या सुमारास गंगुबाई या आळंदी येथील माहेश्वरी भक्तनिवाससमोरील प्रदक्षिणा रोडवरुन पायी चालल्या होत्या. त्यावेळी भरधाव वेगाने आलेल्या (एनएल-०१, एए-३१३७) कंटेनरची जोरदार धडक गंगुबाई यांना बसली. या अपघातात गंगुबाई यांचा जागीच मृत्यू झाला. तर, कंटेनर चालक पसार झाला. घटनेची माहिती मिळताच कंटेनरचा शोध घेत पोलीसांनी कंटेनर चालकाला अटक केली.

You might also like