दफनभूमीच्या मागणीसाठी मृतदेहच आणला महापालिकेत

पुणे : पोलीसानामा ऑनलाईन – आपण नेहमीच वेगवेगळी आंदोलने पाहिली आहेत. आज पुणे महानगरपालिकेच्या आवारात आज एक अनोख आंदोलन पहायला मिळाले. दफनभूमीच्या मागणीसाठी पुणे महानगरपालिकेच्या आवारात मुस्लिम समाजाकडून हे आंदोलन करण्यात आले. विशेष म्हणजे या आंदोलनात मुस्लिम समाजाने मृतदेह आणला होता.

पुण्यातील खराडी भागातील दफनभूमीच्या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्त्व माजी आमदार बापूसाहेब पठारे यांनी केले. तीन वर्षापासून या संदर्भात सत्ताधारी पक्ष आणि प्रशासन यांना पत्रव्यवहार करत आहोत. मात्र त्यांनी लक्ष दिले गेले नाही. म्हणूनच निषेध व्यक्त करण्यासाठी आज महापालिकेत बेवारस मृतदेह आणावा लागला आहे. खराडीत दफनभूमी व्हायला पाहिजे, असं पठारे यांनी सांगितलं.

दरम्यान, दफनभूमी प्रश्न मार्गी लावू, असे आश्वासन महापौर मुक्ता टिळक यांनी दिले. त्यानंतर आंदोलक शांत झाले आणि आंदोलन मागे घेतले.

महत्वाच्या बातम्या

जम्मूत ग्रेनेड हल्ला करणाऱ्याला अटक  पोलिस महासंचालकांची माहिती

वनशैली जन्य रोगाचं प्रमाण वाढतय

खराब मालाची विक्री केल्याने दुकानदारावर सपासप वार

सराकारला प्रश्न विचारणे म्हणजे ट्रेण्ड नव्हे मोदीजी; नेटकऱ्यांनी केले ट्रोल

वाहतूक पोलिसांना मारहाण, तिघांना अटक