तपास लागेना ! मुंबई पोलिसांना ‘जबर’ मारहाण, संतप्त नागरिकांनी गाड्या ‘फोडल्या’ (व्हिडिओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – काही महिन्यांपूर्वी पांचाराम रिठाडिया यांची 17 वर्षांची मुलगी अचानक बेपत्ता झाली होती. मुलीचा शोध घेऊनही तिचा काही थांगपत्ता लागत नसल्यामुळे पंचाराम यांनी नेहरूनगर पोलीस ठाण्यात अपहरणाची तक्रार दाखल केली. पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. मात्र अनेक दिवस होऊनही मुलीचा तपास न लागल्याने नैराश्यातून पित्याने लोकलखाली जाऊन आत्महत्या केली.

अपहरण झालेल्या मुलीचा शोध अद्याप लागू शकलेला नाही. त्यामुळे संतप्त लोकांनी सायन-पनवेल महामार्गावर ठिय्या आंदोलन पुकारले, तर कुर्ला येथील सिग्नल रोखून धरला होता. येथील परिस्थिती हाताबाहेर गेली आणि जमावाकडून पोलिसांना मारहाण करण्यात आली. यावेळी वाहनांवर मोठ्या प्रमाणावर दगडफेक करण्यात आली.

कुर्ला येथील ठक्कर बापा कॉलनीत पांचाराम रिठाडिया हे दोन मुले, मुलगी आणि पत्नीसोबत रहात होते. घरात एकटी मुलगी असल्यामुळे पांचाराम यांचा तिच्यावर जीव होता. मुलगी आता कॉलेजला जाऊ लागली होती. त्यामुळे तिच्या वागण्या-बोलण्यात बरेच फरक घरच्यांना जाणवू लागले होते. मात्र घरच्यांचा तिच्यावर विश्वास असल्याने घरचे याबाबत तिला काहीही बोलत नव्हते.

मुलीच्या चिंतेने वैतागून पित्याने लोकलखाली आत्महत्या केली. तरीही मुलीचा शोध लागत नसल्याने अखेर संतप्त जमावाने कायदा हातात घेऊन पनवेल महामार्ग रोखला आणि पोलीस प्रशासनाबाबत आपली नाराजी व्यक्त केली.

Visit : Policenama.com

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like