Agnipath Scheme Salary | ’अग्निवीर’ला 30% कापून मिळेल पगार, 4 वर्षानंतर हेच पैसे मिळतील एकरकमी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Agnipath Scheme Salary | गेल्या काही दिवसांपासून अग्निपथ योजनेवरून (Agnipath Scheme) देशभरात गदारोळ सुरू आहे. या योजनेला अनेक राज्यांतून हिंसक विरोध (Agniveer Protest) केला जात आहे. या योजनेच्या निषेधार्थ आतापर्यंत अनेक गाड्या जाळण्यात आल्या असून सरकारी मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दुसरीकडे, सरकारी आणि लष्करी प्रकरणातील तज्ज्ञ या योजनेचे कौतुक करत आहेत. (Agnipath Scheme Salary)

 

भरती अधिसूचना जारी

तिन्ही सैन्याने अग्निवीरांच्या भरतीबाबत अधिसूचना (Agniveer Notification) ही जारी केली आहे. या योजनेअंतर्गत सैन्यात भरती होणार्‍या तरुणांना (Agniveer Salary) किती पगार मिळणार आहे आणि निवृत्तीनंतर त्यांना कोणते फायदे (Agniveer Retirement Benefits) मिळणार आहेत ते जाणून घेवूयात…

 

सेवा निधी निधीसाठी 10% कपात

सरकारी अधिसूचनेनुसार, अग्निवीर योजनेंतर्गत भरती झालेल्या लोकांचा दरमहा 30 टक्के पगार कापला जाईल. अधिसूचनेनुसार, अग्निवीरांचा पहिल्या वर्षी एकूण पगार (Agniveer Total Salary) 30 हजार रुपये असेल.

यातून सेवा निधी निधीसाठी (Sewa Nidhi Fund) 30 टक्के म्हणजेच 9 हजार रुपयांची कपात केली जाईल. अशाप्रकारे अग्निवीरांचा पहिल्या वर्षीचा पगार 21 हजार रुपये होईल. अग्निवीर सेवा निधी (Agniveer Sewa Nidhi Fund) मध्ये जमा केलेली रक्कम चार वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर एकरकमी दिली जाईल. (Agnipath Scheme Salary)

 

दुसर्‍या वर्षी इतका वाढेल पगार

दुसर्‍या वर्षी अग्निवीरांच्या पगारात 10 टक्के वाढ करण्यात येईल, असे सरकारने म्हटले आहे. त्यामुळे दुसर्‍या वर्षी एकूण पगार 33 हजार रुपये होणार आहे. यापैकी 9,900 रुपये सेवा निधीत जातील आणि अग्निवीरांना दरमहा 23,100 रुपये मिळतील.

तिसर्‍या वर्षी या तरुणांचा एकूण पगार 36,500 रुपये होईल. यापैकी 10,950 रुपये सेवा निधी निधीसाठी असतील आणि हातातील वेतन 25,550 रुपये असेल.

 

चार वर्षांनंतर एकरकमी मिळेल इतकी रक्कम

चौथ्या आणि अंतिम वर्षात अग्निवीरांचा एकूण पगार आणखी वाढून 40,000 रुपये होईल.
चौथ्या वर्षात अग्निवीरांना दरमहा 28 हजार रुपये मिळतील. उर्वरित 12 हजार रुपये सेवा निधीत जमा केले जातील.

अशाप्रकारे, संपूर्ण चार वर्षांच्या सेवा निधी पॅकेजमधील प्रत्येक अग्निवीरचे योगदान 5.02 लाख रुपये असेल.
सरकार स्वत:च्या वतीने 5.02 लाख रुपये निधीमध्ये जमा करणार आहे.
अशाप्रकारे, चार वर्षांचा कार्यकाळ संपल्यानंतर अग्निवीरांना एकरकमी 10.04 लाख रुपये मिळतील.

 

सेवानिधी निधीवर मिळेल व्याज

याशिवाय सरकार अग्निवीरांना इतर फायदेही देणार आहे. सेवानिधी निधीत जमा झालेल्या रकमेवरही सरकार व्याज भरणार आहे.
व्याजाचा दर EPFO च्या पेन्शन योजना कर्मचारी भविष्य निर्वाह निधीवर मिळणार्‍या व्याजाइतका असेल.

 

फंडावर मिळेल प्राप्तीकरातून सूट

अग्निवीरांच्या पगारातून पीएफ कपात (PF Deduction) होणार नाही.
सर्व्हिस फंडाच्या एकरकमी पेमेंटवर देखील प्राप्तीकर (Income Tax) भरावा लागणार नाही. अग्निवीरांच्या मूळ वेतनावर स्टँडर्ड इन्कम टॅक्स कायदा (Income Tax Rules) लागू होईल.

 

Web Title :- Agnipath Scheme Salary | agniveer scheme salary calculator benefits and disadvantages after retirement job opportunities

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा