3 मुलांसोबत चक्क 13 मुलीं नको ‘त्या’ अवस्थेत, पोलिसांनाही वाटली ‘लाज’, पुढं झालं असं काही

आग्रा : वृत्तसंस्था – ताजगंजमधील बसई येथे एका घरात सुरु असलेल्या सेक्स रॅकेटचा पोलिसांना पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी या घरात छापा टाकल्या त्यावेळी 13 मुली 3 तरुणांसोबत अशा अवस्थेत आढळून आल्या की समोरचे दृष्य पाहून पोलिसांना देखील लाज वाटली. पोलिसांना या ठिकाणी स्थानिक मुलींसह राजस्थान आणि इतर शहरामधील मुली आढळून आल्या. पोलिसांनी ही कारवाई रविवारी (दि.2) सांयकाळी स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने केली. यावेळी घरामधून 13 मुली, दोन संचालक आणि 3 ग्राहकांना अटक केली. त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बसईतील एका घरात मुलींना जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडले जात असल्याची माहिती फ्रीडम फर्म संघटनेने पोलिसांना दिली होती. संघटनेचे सीओ विकास जयस्वाल यांनी पोलिसांच्या मदतीने रविवारी सायंकाळी चार वाजता घरावर छापा टाकला. घरातील एकूण आठ खोल्यांमध्ये मुली आणि तरुण होते. पोलिसांनी सर्वांना ताब्यात घेतले. घरात सापडलेल्या 13 मुलींपैकी काही राजस्थानातील धौलपूर, मनिया आणि बूंदी येथील असून काही स्थानिक आहेत. पोलिसांनी सर्वांना ताजगंज पोलीस ठाण्यात नेऊन त्यांची कसून चौकशी  केली.

चौकशी दरम्यान महिलांनी सांगितले की, ते त्यांच्या इच्छेनुसार त्या ठिकाणी राहात आहेत. आर्थिक परिस्थितीमुळे या ठिकाणी असल्याचे मुलींनी सांगितले. दलालापैकी एक महिला मुंबईत राहते आणि दुसरी मुलींचा या ठिकाणी राहण्याची व्यवस्था करते. एक महिन्यापासून या ठिकाणी हा धंदा सुरु होता. सीओ सदर विकास जयस्वाल यांनी सांगितले की, वेश्याव्यावसाय प्रकरणी दोन्ही चालक आणि तीन ग्राहकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तरुणींना महिला संरक्षण गृहात पाठवण्यात आले आहे.