5.9 एकर जमीन अन् 142 कोटी रूपयांचं बजेट, असे असणार आग्रा येथील छत्रपती शिवाजी महाराजांचं म्युझियम, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –    उत्तर प्रदेशात आता एका इमारतीचे नामकरण करण्यात आले आहे. योगी आदित्यनाथ सरकारने आग्रामध्ये बनवल्या जाणार्‍या मुघल संग्रहालयाचे नाव बदलून छत्रपती शिवाजी महाराज केले आहे. या निर्णयाची माहिती देताना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की गुलामीची मानसिकता असणाऱ्या प्रतीक चिन्हांना आपल्या नवीन उत्तर प्रदेशात स्थान नाही. आपल्या सर्वांचे नायक छत्रपती शिवाजी महाराज आहेत.

हे संग्रहालय ताजमहालाच्या पूर्वेकडील असलेल्या द्वाराजवळ बांधले जात आहे. हा संपूर्ण प्रकल्प 5.9 एकर जागेवर तयार करण्यात येत असून त्याचे बजेट 142 कोटी रुपये आहे. 2017 पूर्वी अखिलेश यादव यांच्या नेतृत्वातील सपा सरकारमध्ये संग्रहालयाचे बांधकाम सुरू झाले होते. संग्रहालय इमारत बांधण्याची जबाबदारी उत्तर प्रदेशच्या पर्यटन विभागाला देण्यात आली आहे. याचे 40 टक्के काम पूर्ण झाले आहे. तर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी यावर्षी हे काम पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

संग्रहालयामध्ये काय असेल?

आग्राचा इतिहास मुघल काळाशी जोडलेला आहे. म्हणूनच ताजमहाल, लाल किल्ला आणि त्याच्याशी संबंधित गोष्टी देखील यात दिसतील. याशिवाय छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळाशी संबंधित गोष्टी संग्रहालयात ठेवल्या जातील. याव्यतिरिक्त, मुघल काळाशी संबंधित वस्तू आणि कागदपत्रे देखील ब्रज क्षेत्रात ठेवल्या जातील. सूरदास यांचा संबंधही आग्र्याशी आहे, त्यामुळे सूरदास यांच्याशी संबंधित वस्तू देखील या संग्रहालयात ठेवल्या जातील, तसेच संपूर्ण ब्रजच्या वारसाचे दृश्य या संग्रहालयात दिसून येईल.

छत्रपती शिवाजी महाराजांचे आग्रा कनेक्शन

आग्रा या किल्ल्याच्या चारही बाजूंना खंदक आहे. कोरडे खंदक आणि पाण्याचे खंदक. मोगल काळात यमुना नदी आग्रा किल्ल्याजवळून वाहून होती. यमुनेकडे उघडणाऱ्या आग्रा किल्ल्याच्या दरवाजास वाटर गेट असे म्हणतात. येथून शिवाजी महाराजांच्या कारागृहात जाण्याचा मार्ग आहे. असे म्हणतात की आग्रा किल्ल्यावरून शिवाजी महाराज वाटर गेटने गायब झाले होते. आग्रा किल्ल्याचे वरिष्ठ संरक्षण सहाय्यक अमरनाथ गुप्ता म्हणतात की जर शिवाजी महाराज किल्ल्यात कैद राहिले असतील तर वाटर गेट मधूनच त्यांची सुटका झाली असेल, कारण मुख्य द्वारावरून जाणे शक्य नव्हते.

छत्रपती शिवाजी महाराज 16 मार्च 1666 रोजी आग्रा येथे आले होते

छत्रपती शिवाजी महाराज 16 मार्च 1666 रोजी आपले मोठे पुत्र संभाजी महाराजांसमवेत आग्रा येथे आले होते. इतिहासकारांचे म्हणणे आहे की जेव्हा मुघल बादशहा औरंगजेबने योग्य सन्मान दिला नाही तेव्हा शिवाजी महाराजांनी मनसबदार हे पद नाकारले. मग ते राजा जय सिंहचे पुत्र राम सिंह यांच्या घरी थांबले. औरंगजेबाने राम सिंहला सांगितले की शिवाजी महाराजांना घेऊन आग्रा किल्ल्यावर यावे. असे म्हणतात की शिवाजी महाराज आले नाहीत. यावर औरंगजेबाने शिवाजी महाराजांना राम सिंहच्या राजवाड्यातच कैद केले. काही इतिहासकारांचे म्हणणे आहे की शिवाजी महाराज आग्राच्या किल्ल्यात कैदेत राहिले.

शिवाजी महाराज अशाप्रकारे गडावरुन सुटले

असे म्हणतात की शिवाजी महाराजांनी किल्ल्यात कैद असताना आजारी पडण्याचे निमित्त केले. 13 ऑगस्ट 1666 रोजी ते फळांच्या टोपलीमध्ये बसून आग्र्याहून सुटले. कोठडीत शिवाजी महाराजांच्या जागी त्यांचे चुलत भाऊ हीरोजी चादर ओढून पडून राहिले. यामुळे सुरक्षा रक्षकांना काहीच समजू शकले नाही.

कुठे-कुठे गेले शिवाजी महाराज?

असे म्हणतात की शिवाजी महाराज यमुनेतील एका नावेत बसून ताजगंज स्मशानभूमीत असलेल्या मंदिराच्या दिशेने आले होते. काही दिवस ते इथे राहिले. स्टेशन रोडवरील महादेव मंदिरात थांबायची देखील एक आख्यायिका आहे. साधू-संतांच्या समूहात बसून ते मथुराला रवाना झाले. औरंगजेब लाखो प्रयत्न करुनही शिवाजी महाराजांना पकडू शकला नाही.