योगी सरकार ‘आग्र्या’चं नाव बदलण्याच्या तयारीत, ‘ही’ असू शकते नवी ओळख

आग्रा : वृत्तसंस्था – इलाहाबाद आणि फैजाबादचं नाव बदलल्यानंतर आता उत्तर प्रदेशातील योगी सरकार ताज नगरी आग्र्याचं नाव बदलण्याच्या तयारीत आहे. अंसही म्हटलं जात आहे की, आग्र्याचं नाव आता अग्रवन असू शकतं. सरकारनं याची जबाबदारी आंबेडकर विद्यापीठाकडे सोपविली आहे. विद्यापीठातील इतिहास विभागाला नावे सूचवण्यास सांगण्यात आलं आहे. आग्र्याच्या नावासंबंधी पुरावेही विभागाकडून मागविण्यात आले आहेत.

सूत्रांच्या हवाल्याने मिळालेल्या माहितीनुसार, योगी सरकारनं यासंदर्भात इतिहासकारांशी संवाद साधला आहे. इतिहासाच्या जाणकारांनुसार, आग्र्याचं नाव अग्रवन होतं. सरकार आता हे शोधण्याचा प्रयत्न करत आहे की, अग्रवनचं नाव नेमकं कशामुळे आग्रा करण्यात आलं होतं.

याआधीही बदलण्यात आलंय इलाहाबाद आणि फैजाबादचं नाव
योगी सरकारनं याआधी इलाहाबादचं नाव बदलून प्रयागराज ठेवलं होतं तर फैजाबादचं नाव बदलून अयोध्या ठेवलं होतं. याशिवाय मुगलसराय स्टेशनचं नावही पंडित दीनदयाल उपाध्याय जंक्शन करण्यात आलं आहे. इतकेच नाही तर चंदोली जिल्ह्याचं नाव बदलण्याचाही रिपोर्ट सरकारकडे पाठवण्यात आला आहे. परंतु अद्याप यावर कोणताही निर्णय झालेला नाही.

Visit : Policenama.com