भाजपाच्या माजी जिल्हाध्यक्षाच्या फार्म हाऊसवर सुरू होतं सेक्स रॅकेट, पोलिसांनी या पध्दतीनं केला पर्दाफाश

आग्रा : वृत्तसंस्था – देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना गुन्ह्यांचे प्रमाण देखील वाढत आहे. आग्रा पोलिसांनी केलेल्या कारवाईत भाजपच्या माजी जिल्हाध्यक्षच्या फार्म हाऊसवर सुरु असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईमुळे एकच खळबळ उडाली आहे. देहविक्रिचा व्यवसाय करणाऱ्या रॅकेट चालवणाऱ्या रोशनीनं कोठडीत असताना पोलिसांना याची माहिती दिली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी फार्म हाऊसवर छापा टाकून सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला. दरम्यान, हे फार्म हाऊस असलेल्या भाजपच्या माजी जिल्हाध्यक्षावर देखील कारवाई केली जाईल, अशी माहिती पोलीस उपअधीक्षक बबलू कुमार यांनी दिली.

आग्रा पोलिसांनी सेक्स रॅकेट चालवणाऱ्या रोशनीला अटक केली होती. कोठडीत तिच्याकडे केलेल्या चौकशीत तिने देहविक्री करणाऱ्या टोळी बाबत माहिती दिली. आग्रा पोलिसांनी टोळीचा पर्दाफाश करण्यासाठी धडक कारवाई हाती घेतली होती. रोशनी आणि तिच्या साथीदाराला 48 तासांची कोठडी देण्यात आली होती. कोठीत असताना पोलिसांनी केलेल्या चौकशीमध्ये तिने या व्यवसायाशी संबंधित असलेल्या अनेक लोकांची माहिती दिली. यानंतर सिंकदरा पोलिसांनी गुन्हे शाखेच्या मदतीने संयुक्त कारवाई करून फार्म हाऊसवर छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी 9 पुरुष आणि 3 महिलांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून मोबाइल, गावठी पिस्तुल, काडतू, आक्षेपार्ह वस्तू असा मुद्देमाल जप्त केला.

फोनवरून मुलींची बुकिंग
पोलिसांनी सेक्स रॅकेट सुरु असलेल्या फार्म हाऊसवर छापा टाकून आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीमध्ये महत्त्वाची माहिती आरोपींनी दिली. त्यांच्या संपर्कात आलेल्या ग्राहकांना आणि दलालांना ते मुलींचे फोटो दाखवायचे. त्यांनी पसंत केलेल्या मुलींना फार्म हाऊसवर बोलावलं जायचं. अशी माहिती त्यांनी पोलिसांना दिली.

भाजपच्या माजी जिल्हाध्यक्षचा फार्म हाऊस
या फार्म हाऊसवर मागील वर्षभरापासून सेक्स रॅकेट सुरु होतं. हे फार्म हाऊस भाजपचा माजी जिल्हाध्यक्ष अशोक राणा याचे असल्याची माहिती समोर येत आहे. त्याने हे फार्म हाऊस विशाल गोएल याला भाड्याने दिले होते. विशालला पोलिसांनी अटक केली असून अशोक राणा याच्यावर देखील कारवाई करणार असल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक बबलु कुमार यांनी दिली आहे.

पश्चिम बंगाल आणि अन्य जिल्ह्यातील मुलींचा समावेश
देहविक्रीच्या या व्यवसायामधील मुली पश्चिम बंगाल आणि अन्य जिल्ह्यातील आहेत. त्यांना नोकरीचे आमिष दाखवून आणि अन्य प्रकारे फुस लावून या ठिकाणी आणलं जात होतं. त्यांना या देहविक्रेयच्या व्यवसायात ढकलले जात होतं, अशी माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आग्रा येथील पर्यटन व्यवसाय बंद आहे. त्यामुळे हॉटेल व्यवसाय देखील बंद आहे. त्यामुळे तोटा भरून काढण्यासाठी काही हॉटेलमध्ये मागणीनुसार, कॉलगर्ल पुरविल्या जात असल्याची माहिती समोर आली आहे.