Agri Produce Exporters | भारताचा जगातील टॉप-10 कृषी निर्यातदार देशांच्या यादीत समावेश, तांदूळ निर्यातीमध्ये थायलँडला टाकले पाठीमागे

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Agri Produce Exporters | वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायजेशन (WTO) द्वारे मागील 25 वर्षात जागतिक कृषी व्यापाराच्या आकडेवारीवर जारी एका रिपोर्टनुसार, कापूस, सोयाबीन आणि मांस उत्पादन निर्यातीत एका मोठ्या वाढीसह भारत 2019 मध्ये जगातील टॉप-10 कृषी उत्पादक निर्यातदार (Agri Produce Exporters) देशांच्या यादीत सहभागी झाला आहे. भारत आणि भारतीय शेतकर्‍यांसाठी ही एक चांगली बातमी आहे.

2019 मध्ये, जागतिक कृषी निर्यातीत भारताने 3.1 टक्के भागीदारीसह नववे स्थान मिळवले आहे. यापूर्वी या स्थानावर न्यूझीलँड होते. तसेच मेक्सिकोने जागतिक कृषी निर्यातीत 3.4 टक्के भागीदारीसह 7वे स्थान मिळवले आहे, ज्यावर अगोदर मलेशिया होते. 1995 मध्ये 22.2 टक्के भागीदारीसह टॉप-10 देशांच्या यादीत पहिल्या स्थानावर अमेरिका होती. 2019 मध्ये युरोपियन युनियनने 16.1 टक्के भागीदारीसह प्रमुख स्थानावर कब्जा मिळवला आहे.

2019 मध्ये अमेरिकेची भागीदारी कमी होऊन 13.8 टक्के राहिली. ब्राझील तिसरा मोठा निर्यातदार म्हणून आपले स्थान कायम ठेवून आहे. 1995 मध्ये त्याची भागीदारी 4.8 टक्के होती, जी 2019 मध्ये वाढून 7.8 टक्के झाली. चौथ्या स्थानावर चीन आहे, ज्याची भागीदारी 5.4 टक्के आहे. 1995 मध्ये चीन 4 टक्के भागीदारीसह सहाव्या स्थानावर होता.

तर 1995 मध्ये प्रमुख तांदूळ निर्यातदारांमध्ये थायलँड (38 टक्के), भारत (26 टक्के) आणि अमेरिका (19 टक्के) सहभागी होते. 2019 मध्ये, भारताने (33 टक्के) थायलँड (20 टक्के) मागे टाकत पहिले स्थान मिळवले आहे. तर व्हिएतनाम (12 टक्के) ने अमेरिकेला मागे टाकत तिसर्‍या स्थानावर कब्जा केला आहे. 1995 आणि 2019 दोन्ही रिपोर्टमध्ये एकुण निर्यातीमध्ये टॉप-10 निर्यातदार देशांची भागीदारी 96 टक्केपेक्षा जास्त आहे.

भारत 2019 मध्ये तिसरा मोठा कापूस निर्यातदार (7.6 टक्के) आणि चौथा सर्वात मोठा आयातदार (10 टक्के) होता. 1995 मध्ये भारत टॉप-10 देशांच्या यादीत सहभागी नव्हता.

सर्वात जास्त व्यापार असलेले कृषी उत्पादन सोयाबीनमध्ये भारताची भागीदारी खुपच किरकोळ (0.1 टक्के) आहे आणि तो जगात नवव्या स्थानावर आहे. मांस श्रेणीत, भारत 4 टक्के भागीदारीसह जगात आठव्या स्थानावर आहे. 1995 मध्ये भारत सातवा सर्वात मोठा गहू आणि मलमल निर्यातक देश होता परंतु 2019 मध्ये तो टॉप-10 लिस्टमध्ये नाही.

Web Title :- Agri Produce Exporters | business india breaks into the top 10 list of agri produce exporters

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Rain | पुण्याच्या रास्ता पेठेतील केईएम हॉस्पीटलसमोर भरपावसात रिक्षावर झाड कोसळलं; चालकासह महिला जखमी (व्हिडीओ)

Pune Crime | पुण्यातील सायकलचोर ‘आशिक’ पोलिसांच्या जाळ्यात, कोरोनाकाळात केले ‘हे’ उद्योग, जाणून घ्या प्रकरण

Modi Government Schemes | मोदी सरकारच्या ‘या’ 12 योजना, ज्यांच्याद्वारे कर्जापासून उपचारापर्यंत मिळतेय लाखो रुपयांची मदत, जाणून घ्या