कृषी निर्यातीत 15 % ‘घट’, 10 हजार 800 कोटी रूपयांचे ‘परकीय’ चलन घटले, पाहा APEDA ची आकडेवारी

लासलगांव : पोलीसनामा ऑनलाइन (राकेश बोरा) – कृषी संपन्न म्हणून जगभरात भारताला ओळखले जाते. जगामध्ये दुसऱ्या क्रमांकामध्ये शेतमाल निर्यात भारतातून केले जाते. मात्र गेल्या वर्षांच्या तुलनेत कृषी, फळे, अन्न प्रक्रिया उत्पादने यासह अनेक कृषी माल निर्यातीत लक्षणीय घट झाली आहे. एकीकडे आपल्या देशाचे पंतप्रधान २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट केले जाईल, अशा घोषणा करतात व दुसरीकडे उत्पन्न वाढवण्यासाठी जी पावले उचलायला हवीत ती मात्र उचलली जात नाहीत. याच कारणाने मागील वर्षी एप्रिल १८ ते ऑक्टोबर १८ च्या तुलनेत यंदा १५ टक्के घट होऊन १० हजार ८०० कोटी रूपयांचे परकीय चलनात मध्ये घट झाल्याचे एपीडा (APEDA – Agriculture & Processed Food Products Export Development Authority) च्या आकडेवारीवरुण दिसत आहे.

एप्रिल १९ ते ऑक्टोबर १९ या काळात ६१ हजार ६८१ करोड़ रूपयांचा शेतमाल निर्यात झाले असून हीच निर्यात मागील वर्षी एप्रिल १८ ते ऑक्टोबर १८ पर्यंत ७२ हजार ५२३ करोड़ रूपयांची निर्यात झालेली होती. जागतिक बाजारात शेतमालाचे कमी असलेले दर, युरोपियन देशातील वारंवार बदलते निकष, फळे-भाजीपाला निर्यातीमध्ये येत असलेल्या तांत्रिक अडचणी याबरोबर निर्यातीसाठी निर्बंध तर आयातीस प्रोत्साहनाचे शासनाचे धोरण यामुळे निर्यातीचा आलेख खाली तर आयातीचा आलेख वर जात आहे.
शेतमालांचे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये देशातील शेतकरी आपल्या गरजेपेक्षा अधिक उत्पादन घेत आहेत. परंतु, अधिक उत्पादन देशाबाहेर काढण्याचे योग्य नियोजन, त्यास पूरक शासन धोरण नसल्यामुळे देशांतर्गत बाजारात शेतमालाचे दर कोसळत असून त्यात शेतकऱ्यांचेच नुकसान होत आहे.

तुलात्मक आकडेवारी (एपीडा नुसार)

फळे आणि भाजीपाला बीयाने
एप्रिल १८ ते ऑक्टोबर १८ – २०९९० मैट्रिक टन -९१५ करोड़
एप्रिल १९ ते ऑक्टोबर १९ -१८५९९ मैट्रिक टन – ८४६ करोड़

फळे आणि भाजीपाला
एप्रिल १८ ते ऑक्टोबर १८ – २३ लाख ९ हजार मैट्रिक टन – ५६९१ करोड़
एप्रिल १९ ते ऑक्टोबर १९ -१७ लाख ६३ हजार मैट्रिक टन – ५२४४ करोड़

प्रक्रियायुक्त फळे आणि भाजीपाला
एप्रिल १८ ते ऑक्टोबर १८ – ६ लाख ६२ हजार मैट्रिक टन – ४८९५ करोड़
एप्रिल १९ ते ऑक्टोबर १९ -५ लाख ६९ हजार मैट्रिक टन – ४६४२ करोड़

मांस
एप्रिल १८ ते ऑक्टोबर १८ – ७ लाख ४९ हजार मैट्रिक टन – १६४४२ करोड़
एप्रिल १९ ते ऑक्टोबर १९ -६ लाख ८६ हजार मैट्रिक टन – १४३४६ करोड़

दुग्धजन्य पदार्थ
एप्रिल १८ ते ऑक्टोबर १८ – ७९ हजार ४२४ मैट्रिक टन – १४९८ करोड़
एप्रिल १९ ते ऑक्टोबर १९ -७० हजार ३३ मैट्रिक टन – १२२३ करोड़

इतर प्रक्रिया पदार्थ
एप्रिल १८ ते ऑक्टोबर १८ – १० लाख ८५ हजार मैट्रिक टन – ११८१५ करोड़
एप्रिल १९ ते ऑक्टोबर १९ -८ लाख ८४ हजार मैट्रिक टन – १०८१६ करोड़

तृणधान्य
एप्रिल १८ ते ऑक्टोबर १८ – ७८ लाख ३३ हजार मैट्रिक टन – ३१२६६ करोड़
एप्रिल १९ ते ऑक्टोबर १९ -५२ लाख ४९ हजार मैट्रिक टन – २४५६४ करोड़

निर्यातीला हवी प्रक्रिया उद्योगाची जोड –

आपल्या देशात राज्यनिहाय पीक विविधता असल्याने कृषी उत्पादन, निर्यात तसेच प्रक्रिया उद्योगाकडे लक्ष केंद्रीत होणे आवश्यक आहे. सरकारने कृषी माल निर्यातिकडे उद्योग दृष्टीने बघितले पाहिजे. शेतमाल निर्यातीसाठी दीर्घकालीन धोरणाचा विचार होणे आवश्यक आहे. असे सयाद्री एक्सपोर्टचे विलास शिंदे म्हणाले.

फेसबुक पेज लाईक करा –