आमदार खरेदीसाठी भाजपाकडून 10 कोटी, काँग्रेसनं केलं ‘स्टिंग ऑपरेशन’ प्रसिध्द (व्हिडीओ)

अहमदाबाद : वृत्तसंस्था – गुजरातमध्ये ( Gujrat) विधानसभा पोटनिवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. काल संध्याकाळी प्रचाराचा कालावधी संपला असून, त्याआधी आलेल्या व्हिडिओ क्लीपने ( Video Clip) खळबळ उडाली आहे. या व्हिडिओत माजी आमदार सोमा पटेल ( Soma Patel) यांचा व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे. यात भाजपाने ( BJP) १० कोटींपेक्षा अधिक कोणाला दिले नाहीत असं म्हटलं आहे. काँग्रेसने ( Congress) घेतलेल्या पत्रकार परिषदेत या स्टिंग ऑपरेशनचा ( Sting operation) व्हिडिओ प्रसिद्ध करण्यात आला. या व्हिडिओमधून काँग्रेसने भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे. या व्हिडिओमध्ये घोडेबाजार केला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्याचबरोबर आमदारामागे प्रत्येकी १० कोटी रुपये दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. व्हिडिओत सोमा पटेल गुजरातचे मुख्यमंत्री आणि भाजपा अध्यक्षांच्या संपर्कात असल्याचे सांगितले आहे.

 

 

 

 

 

 

 

 

सोमा पटेल या व्हिडिओत ज्या व्यक्तीबरोबर संवाद साधत आहेत, त्याचे नाव अंकित बारोट ( Ankit Barot) असं सांगण्यात आलं आहे. अंकित बारोट हा गांधीनगर महापालिकेत नगरसेवक आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर काँग्रेस आणि भाजपमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. यामध्ये भाजपने निवेदन प्रसिद्ध केलं असून यामध्ये भाजपचे अध्यक्ष सीआर पाटील यांनी म्हटलं की, कॉंग्रेसला पोटनिवडणुकांच्या आठही जागांवर पराभव समोर दिसत आहे. त्यामुळे ते जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत आहेत. निवडणुकीपूर्वी गोंधळ आणि खोटे बोलणे ही कॉंग्रेसची सवय आहे. सोमाभाईंनी १५ मार्च रोजी राजीनामा दिला होता, तर मी २० जुलै रोजी भाजपा अध्यक्षांची जबाबदारी स्वीकारली होती.

दरम्यान, हा व्हिडिओ समोर आल्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित चावडा, माजी अध्यक्ष अर्जन मोढवाडिया यांनी या प्रकरणाची सीबीआय चौकशी करावी, अशी मागणी केली आहे. सोमा पटेल स्पष्ट शब्दात सांगत आहेत त्यांना १० कोटी रुपये दिले आहेत. गुजरातमध्ये मागील २ वर्षांत झालेल्या राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसच्या २० आमदारांनी राजीनामा दिला आहे. यातील काही जण भाजपात सहभागी झाले आहेत. कुंवरजी बावलिया आणि जवाहर चावडा यांना कॅबिनेटमंत्री बनवण्यात आलं आहे. तर काहीजण भाजपाच्या तिकिटावर निवडून आले आहेत. त्यानंतर आता राजीनामा दिलेल्या आमदारांचा या निवडणुकीत काय होते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.