शरद पवारांनी घेतली PM मोदींची भेट, केल्या ‘या’ महत्वाच्या मागण्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राज्यात एकीकडे सत्तास्थापनेचा घोळ सुटत नसताना आता राजकीय कोंडी वाढलली आहे. परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे झालेले नुकसान, ओला दुष्काळ या सर्व पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची संसदेत भेट घेतली. या दरम्यान मोदींनी अर्थमंत्री निर्मला सितारामन यांना कार्यालयात बोलावून घेतल्याचे वृत्त आहे.

पवार दुपारी साडेबाराच्या दरम्यान संसदेतील पंतप्रधान कार्यालयात दाखल झाले. त्यामुळे एकीकडे राज्यातील महाशिवआघाडी सत्तास्थापनेकडे कूच करत असताना अचानक पवार यांनी पंतप्रधान मोदींची जवळपास 40 मिनिटे भेट घेतली. त्यांच्या या भेटीने राजकीय चर्चांना उधाळ आले आहे.

राज्यातील शेतकऱ्यांच्या मुद्यावर जरी ही भेट झाली असे सांगण्यात येत असले तरी या भेटत फक्त शेतकऱ्यांच्या मुद्यावर नक्कीच चर्चा झालेली नसणार, त्याला राजकीय चर्चेची झालर देखील असणार असे सांगण्यात येत आहे. त्यामुळे शरद पवार राज्याच्या राजकारणात केंद्र स्थानी दिसत आहेत.

पंतप्रधानांबरोबर झालेल्या या बैठकीत शरद पवारांनी मोदींना एक पत्र देखील दिले आहे. या पत्रात राज्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्यात आले आहेत.
1. शेतकऱ्यांना संपूर्ण आणि बिनशर्त कर्जमाफी द्या.
2. कृषीकर्ज पूर्ण माफ करा.
3. राज्यातील राष्ट्रपती राजवटीमध्ये पंतप्रधान मोदींनी हस्तक्षेप करावा.
4. मोठ्या मदतीसाठी तातडीने पावले उचलणे आवश्यक आहे.

Sharad Pawar

भाजपकडून ऑफर ?
सत्तास्थापनेवरुन राज्यात अजूनही गोंधळ सुरु आहे. भाजप शिवसेना युतीचे देखील बिनसले आहे. परंतू शिवसेना आणि आघाडीमध्ये जुळताना दिसत आहे. निकालानंतर आम्हाला विरोधीपक्षांच्या बाकावर बसण्याचे जनमत मिळाले आहे असे म्हणणारे विरोधी पक्ष आता राज्यातील राजकारणाच्या केंद्र स्थानी आहेत. या तिन्ही पक्षात सत्तास्थापनेसाठी चर्चा सुरु आहे. आता राज्यातील राजकारण दिल्लीत जाऊन पोहचले आहे.

भाजपने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना राष्ट्रपती पदाची ऑफर दिली आहे. याशिवाय राज्यातील आणि केंद्रातील सरकारमध्ये सन्मानजनक वाटा देण्याचे आश्वासन दिल्याचे वृत्त आहे. या वृत्तामुळे राज्यातील राजकारणात खळबळ उडाली आहे. परंतू या कथित ऑफर बद्दल राज्यातील राष्ट्रवादीच्या कोणत्याही नेत्याने अधिकृत भाष्य केले नाही.

भाजपकडून राष्ट्रवादीला ऑफर असल्याची चर्चा रंगू लागली आहे. परंतू पवार आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचे सांगण्यात येत आहे. नुकत्याच झालेल्या परिषदेत पवारांनी भाजपसह जाण्यास नकार दिला. त्यामुळे येत्या काळात राज्यातील राजकारणाला काय रंग चढणार हे लवकरच स्पष्ट होईल.

Visit :  Policenama.com