मोदींच्या भारत भेटीपूर्वी ट्रम्प यांचे मोठे विधान, म्हणाले…

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था – अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे  भारत आणि पाकिस्तानच्या पंतप्रधानांची भेट घेणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौर्‍यापूर्वी त्यांनी हे विधान केले आहे. ट्रम्प 22 सप्टेंबर रोजी ह्युस्टनमध्ये मोदींसमवेत Howdy Modi कार्यक्रमास संबोधित करणार आहेत. मात्र, ते पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना कधी भेटतील हे त्यांनी सांगितले नाही. सोमवारी व्हाईट हाऊसमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी ही माहिती दिली आहे.

मोदींच्या अमेरिका भेटीच्या अगोदर ट्रम्प यांनी सांगितले की,  ते भारतीय पंतप्रधानांना भेटण्याबरोबरच पाकिस्तानच्या पंतप्रधानांनाही भेटतील. ट्रम्प यांनी मात्र ते पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांची भेट कधी घेतील याचा खुलासा केला नाही, परंतु या महिन्यात न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या महासभेच्या अधिवेशनाच्या वेळी ते पाकिस्तानच्या  पंतप्रधानांची भेट घेण्याची शक्यता आहे.

भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प म्हणाले की, भारत पाकिस्तानमधील तणाव दूर होण्यामध्ये मोठी प्रगती झाली आहे. मात्र त्यांनी बोलताना  काश्मीरचा उल्लेख करणे टाळले.

ट्रम्प यांच्या कार्यक्रमानुसार, २२ सप्टेंबर रोजी हॉस्टनमध्ये मोदींसोबत ‘  Howdy Modi कार्यक्रमास संबोधित केल्यानंतर ते ओहियोला भेट देतील. त्यानंतर ते संयुक्त राष्ट्रांच्या महासभेच्या वार्षिक सत्रासाठी न्यूयॉर्कला जातील. यावेळी ते इम्रान खान यांची भेट घेतील अशी अपेक्षा आहे.

You might also like