अहमदनगर : शहर वकील संघटनेची निवडणूक बिनविरोध, अध्यक्षपदी ॲड. भूषण बऱ्हाटे

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – न्यायप्रविष्ठ झालेली शहर वकील संघटनेची निवडणूक आज अखेर बिनविरोध झाली. संघटनेच्या सर्व सदस्यांनी आपापसातील मतभेद बाजूला ठेवून एकमताने निवडणूक करण्याचा निर्णय घेतला. अनुभवी व ज्येष्ठ वकिलांनी यात पुढाकार घेतला. निवडणूक अधिकारी ॲड. ए. बी. भालसिंग यांनी निवडणूक प्रक्रिया सुरू केल्यानंतर अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी अध्यक्षपदासाठी ॲड. भूषण बऱ्हाटे, उपाध्यक्षपदासाठी ॲड. सुहास टोणे, सचिवपदासाठी अमोल धोंडे, खजिनदार चेतन रोहकले, महिला सहसचिव मीनाक्षी कराळे आदींचेच अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी संघटनेची निवडणूक बिनविरोध झाल्याचे जाहीर केले.

पदाधिकाऱ्यां बरोबरच संघटनेचे कार्यकारणी सदस्यही बिनविरोध निवडून आले, यात विनोद शेटे, सुनिल तोडकर, रियाज शेख, संदीप बुरके, दीपक वाऊत्रे, अक्षय भांड व राणी भुतकर यांचा समावेश आहे. पदाधिकाऱ्यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर होताच न्यायालयाच्या आवारात गुलालाची उधळण करत वकिलांनी जल्लोष केला. एकमेकांना गुलाल लावण्याबरोबरच पेढेही भरवण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी ॲड. ए. बी. भालसिंग यांना सहाय्यक निवडणूक अधिकारी ॲड.बी. एम. घुले व संदीप शेळके यांनी सहकार्य केले. यावेळी संघटनेचे मावळते अध्यक्ष शेखर दरंदले, उपाध्यक्ष गजेंद्र पिसाळ व खजिनदार राजेश कावरे यांनी नूतन अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिवांचा सत्कार करून अभिनंदन केले.

निवडून आल्यानंतर प्रतिक्रिया देतांना वकील संघटनेचे नूतन अध्यक्ष भूषण बऱ्हाटे म्हणाले, नगर जिल्हा न्यायालयातील वकील संघटनेला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. अनेक दिग्गज विधिज्ञांनी अध्यक्षपदाची धुरा सांभाळली आहे. आता संघटनेच्या सर्व सदस्यांनी एकमताने माझ्यावर विश्वास व्यक्त करत मला संघटनेचे अध्यक्षपद दिले आहे. या विश्वासाला पात्र रहात सर्वांना बरोबर घेऊन नूतन कार्यकारणी काम करणार आहे. न्यायालयात काम करताना न्यायाधीश व वकील यांच्यामधील सुसंवाद व समन्वय अजून कसा वाढेल यासाठी प्रयत्न करणार आहे. प्रमुख्याने जे नवीन वकील आहेत त्यांच्यासाठी तज्ञ वकिलांचे विविध विषयांवरील व्याख्याने आयोजित करणार आहोत, जेणे करून नवीन वकिलांना चांगले मार्गदर्शन होईल. अनेक ज्येष्ठ व मित्र वकिलांनी अध्यक्षपदासाठी सहकार्य केले आहे. त्यांचे आभार मानण्या बरोबरच निवडणूक निर्णय अधिकारी भालसिंग यांनी व्यवस्थित ही निवडणूक हाताळली त्यांचेही आभार.

यावेळी विशेष सरकारी वकील ॲड. सुरेश लगड, माजी अध्यक्ष ॲड.लक्ष्‍मण कचरे, ॲड.विश्वास चितळे, रमेश कराळे, अशोक गुंड, संदीप ढापसे, सुरेश कोहकडे, युवराज पाटील, अजिंक्य काळे, कानिफ पवार, अनिल सरोदे, सुभाष धामणे, संतोष शिंदे, अण्णा वाळ्के, सुनील ढोकणे, सुरेश भोर, मंगेश सोले, धनंजय वाघ, कृष्णा झावरे, राजेश कातोरे, धोंडीराम मावळे, बाळासाहेब पवार, रवींद्र विटेकर, एन. आर. शिंदे, भानुदास होले, महेश शिंदे, शारदा लगड, आबा मुरमकर, संगीता पाडळे, जया पाटोळे, सविता साठे, आदि वकील वर्ग उपस्थित होता.

Visit : policenama.com