अहमदनगर : जिल्हा बँकेला ‘सहकार निष्ठ’ पुरस्कार

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेस राज्य शासनाचा “सहकार निष्ठ” हा जिल्हा बँकांसाठी दिला जाणारा पुरस्कार महाराष्ट्र शासनाकडून जाहीर झाला आहे.

महाराष्ट्र शासनाच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाचे अवर सचिव रमेश शिंगटे यांनी काल राज्यातील सहकार क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या सहकारी संस्था यांना सहकार महर्षी, सहकार भूषण व सहकार निष्ठ पुरस्कार यांची नावे शासनाच्या परिपत्रकाद्वारे जाहीर केले आहेत. महाराष्ट्र राज्यातील जिल्हा सहकारी बँकेच्या एकूण कामकाजाच्या संदर्भात अभ्यास करून शासनाची कमिटी या पुरस्कारासाठी राज्यातील जिल्हा बँकेची निवड करते. लवकरच हा पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे.

अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला “सहकार निष्ठ” पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बँकेचे चेअरमन सिताराम पाटील गायकर म्हणाले, अहमदनगर सहकारी जिल्हा बँकेस स्थापनेपासून अतिशय उत्कृष्ट नेतृत्व लाभल्याने व बँक सेवक कार्यक्षमतेने काम करत असल्याने जिल्हा बँकेला हा पुरस्कार मिळाला आहे. महाराष्ट्र शासनाचा हा पुरस्कार बँकेचा सन्मान असून बँकेचे सभासद, ठेवीदार व शेतकरी यांचा बँकेवर विश्वास असल्याने बँकेची प्रगती होत आहे.

बँकेने नेहमीच जिल्ह्याच्या विकासाचे कामकाज केले केले असून सहकार क्षेत्रात बँकेचे मोठे योगदान आहे. सहकारनिष्ठ पुरस्कार मिळाल्याने बँकेच्या संचालक मंडळ यांनी समाधान व्यक्त केले आहे. या पुरस्कारामुळे बँकेचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे

आरोग्यविषयक वृत्त