पालकमंत्री शिंदेंसह 7 जणांचे उमेदवारी अर्ज दाखल

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज विविध मतदारसंघातून सात उमेदवारांनी त्यांचे नामनिर्देशनपत्र दाखल केले. त्यात पालकमंत्री राम शंकर शिंदे यांच्यासह इतर मातब्बर उमेदवारांचा समावेश आहे.

श्रीरामपूर मतदारसंघात अशोक निवृत्ती बागुल यांनी भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस आणि अपक्ष असे दोन अर्ज दाखल केले. नेवासा मतदारसंघात सुनिता शंकरराव गडाख यांनी एक अर्ज क्रांतिकारी शेतकरी पार्टी व एक अर्ज अपक्ष असे दोन अर्ज दाखल केले. पारनेर मतदारसंघात भाऊसाहेब माधव खेडेकर यांनी अपक्ष आणि निलेश ज्ञानदेव लंके यांनी नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टीच्यावतीने अर्ज सादर केले. श्रीगोंदा मतदारसंघात बबनराव पाचपुते यांनी भारतीय जनता पक्षाच्यावतीने अर्ज दाखल केला. कर्जत-जामखेड मतदारसंघात रामदास शंकर शिंदे यांनी भारतीय जनता पक्षाच्या वतीने दोन अर्ज दाखल केले. तर सुमित कन्हैय्या पाटील यांनी अपक्ष एक अर्ज दाखल केला.

२१६-अकोले (अनुसूचित जमाती) मतदारसंघात मंगळवारी 7 जणांनी 10 अर्ज नेले. २१७-संगमनेर विधानसभा मतदारसंघात एकूण 7 जणांनी 17 नामनिर्देशनपत्रे नेली. २१८-शिर्डी मतदारसंघात 7 जणांनी 9 अर्ज नेले. २१९-कोपरगाव मतदारसंघात 13 उमेदवारांनी 22 अर्ज नेले. २२०-श्रीरामपूर मतदारसंघात 16 जणांनी 21 नामनिर्देशनपत्रे नेली. २२१-नेवासा मतदारसंघात 6 व्यक्तींनी 6 अर्ज नेल्याची माहिती निवडणूक यंत्रणेने दिली. २२२-शेवगाव मतदारसंघात 9 जणांनी 19 अर्ज नेले. २२३-राहुरी मतदारसंघात 10 जणांनी 12 अर्ज नेले. २२४ – पारनेर मतदारसंघात 11 व्‍यक्‍तींनी 12 अर्ज नेले. 225-अहमदनगर शहर विधानसभा मतदार संघात एकुण 10 लोकांनी 15 अर्ज नेले. 226-श्रीगोंदा विधानसभा मतदार संघात आज एकुण 10 लोकांनी 16 अर्ज नेले. 227-कर्जत-जामखेड विधानसभा मतदार संघात आज एकुण 7 लोकांनी 13 अर्ज नेले.

Visit : policenama.com