मारहाणीत जखमी झालेल्याचा उपचारादरम्यान पुण्यात मृत्यू, शहरात खळबळ

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – अंगावर दुचाकी घालून केलेल्या मारहाणीत जखमी झालेल्या समाज केदारे (रा. बुरूडगाव, नगर) यांचा उपचारादरम्यान पुण्यातील ससून रुग्णालयात मृत्यू झाला. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

याप्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात संजय पाचरणे (रा. बुरूडगाव, ता. नगर) याच्याविरुद्ध खुनाचे कलम वाढवविण्यात आले आहे. याबाबत माहिती अशी की, १२ ऑगस्ट रोजी दुपारी संजय पाचरणे याने दीपक केदारे यांचा भाऊ समाज केदारे यांच्या उजव्या पायावर बुलेट गाडी घातली होती. दीपक याने माझ्याविरोधात दिलेला जबाब मागे घे, नाहीतर तुला जिवे मारून टाकीन, अशी धमकी देऊन अंगावरून बुलेट घातली होती. तसेच त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली होती. या मारहाणीत केदारे यांना दुखापत झाल्याने उपचारासाठी पुण्यातील ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना आज केदारे यांचा मृत्यू झाला.

याप्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात संजय पाचारणे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विकास वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

आरोग्यविषयक वृत्त –