भारतीय रेल्वेचे लवकरच होणार ‘खासगीकरण’, ‘IRCTC’ चालवणार ‘तेजस’ एक्सप्रेस

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय रेल्वे खासगीकरणाकडे वाटचाल करत आहे. रेल्वेने निर्णय घेतला आहे की दिल्ली-लखनऊ आणि अहमदाबाद-मुंबई मार्गावार चालवण्यात येणाऱ्या तेजस एक्सप्रेसला IRCTC कडे सोपवणार. हे प्रायोगिक तत्वावर असणार आहे. जर ही चाचणी यशस्वी झाली तर इतर मार्गांवरील रेल्वे चालवण्याची जबाबदारी IRCTC ला मिळू शकते.

तेजस एक्सप्रेस चालवण्यात येणाऱ्या दोन्ही मार्गावरील भाडे IRCTC च ठरवणार आहे. या संबंधी तयार करण्यात आलेल्या ब्लूप्रिंट नुसार IRCTC या दोन्ही मार्गावर चालवण्यात येणाऱ्या रेल्वेची ३ वर्षांसाठी जबाबदारी स्विकारेल. ही प्रयोगिक तत्वावर चालवण्यात येणार आहे. रेल्वेने स्पष्ट केले आहे की या रेल्वेत स्टाफकडून तिकिट चेकिंग करण्यात येणार नाही.

ब्यूप्रिंटमध्ये दिलेल्या माहितीनुसार तेजस एक्सप्रेस रेल्वेचे प्रशिक्षित लोको पायलट, गार्ड आणि स्टेशन मास्टर चालवतील. या रेल्वे शताब्दी एक्सप्रेसच्या धरतीवर चालवण्यात येतील. आता आयआरसीटीसीला या रेल्वेची जबाबदारी देण्यासंबंधित प्रक्रिया सुरु आहे.

भारतीय रेल्वेने प्रवाशांना वर्ल्ड क्लास पॅसेंजर सुविधा देण्यासाठी आपल्या १०० दिवसीय अजेंड्याअंतर्गत काही रेल्वे खासगी ऑपरेटर्सला चालवायला देणार असल्याचे सांगितले होते.

आरोग्यविषयक वृत्त

 

You might also like