अहमदनगर महापौर निवडणूक : श्रीपाद छिंदमला सभागृहात मारहाण

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – अहमदनगर महापौर पदाच्या निवडीसाठीचे मतदान घेण्यात येत आहे. या निवडीच्या मतदानाकरिता आलेल्या श्रीपाद छिंदमला सभागृहात मारहाण करण्यात आल्याची माहिती मिळते आहे. आज महापौर निवडीच्या दरम्यान शिवसेनेच्या गटनेते रोहिणी शेंडगे यांनी ‘आम्हला श्रीपाद छिंदम याचे मत नको ‘अशा आशयाचे पत्र निवडणूक अधिकाऱ्याला दिले आहे. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या श्रीपाद  छिंदम याला सभागृहातच मारहाण करण्यात आली आहे.

काय घडला प्रसंग ?
महापौर पदाच्या निवडीकरिता पिठासेनाधिकारी दिनेश द्विवेदी यांनी उपस्थितांना  ‘कुणाकुणाला शिवसेनेला मत द्यायचे आहे, त्यांनी हात वर करा’ असे आवाहन केले. त्यांच्या या आवाहनानंतर लगेचच वादग्रस्त श्रीपाद  छिंदम यांनी देखील हात वर केला. मात्र आधीच ‘आम्हला श्रीपाद छिंदम याचे मत नको’ असे शिवसेनेचे मत होते. त्यातच  श्रीपाद छिंदम यांनी शिवसेनेला मत देण्यासाठी हात वर केल्यामुळे शिवसेना नगर सेवक योगीराज गाडे यांना संताप अनावर झाला. त्यांनी  श्रीपाद छिंदम याला मारहाण करायला सुरुवात केली. त्यानंतर उपस्थित सर्वच मतदारांनी यात हात धून घेतला. श्रीपाद छिंदम याला मारहाण केली.
छत्रपतींसमोर नतमस्तक होण्याचा छिंदमचा स्टंट 
शिवरायांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या श्रीपाद छिंदमने अहमदनगर महापालिकेची निवडणूक लढवली होती. विशेष म्हणजे अपक्ष निवडणूक लढवूनही छिंदम या निवडणुकीत विजयी झाला. मात्र, छिंदमच्या या विजयाला आक्षेप घेण्यात आला आहे. यापूर्वी जिल्ह्यातून तडीपार केल्याची मुदत संपल्यानंतर मंगळवारी छिंदम छत्रपतींसमोर नतमस्तक झाला. महापलिका निवडणुकीत विजय मिळाल्यानंतर छिंदम मंगळवारी नगरमध्ये दाखल झाला. त्याने आपल्या कार्यालयात शिवाजी महाराजांसह डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
तरीही निवडून आला छिंदम
शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरलेले श्रीपाद छिंदम हे नगरमधून २००० मतांनी विजय मिळाला. महापालिका निवडणुकीत छिंदमने प्रभाग क्रमांक ९ मधून अपक्ष उमेदवारी करीत विजय मिळविला. या प्रभागात छिंदमविरोधात अनिता राजेंद्र राठोड (राष्ट्रवादी), सुरेश रतनप्रसाद तिवारी (सेना), प्रदीप परदेशी (भाजप), पोपट भानुदास पाथरे (मनसे), प्रवीण शाहूराज जोशी (अपक्ष), निलेश सत्यवान म्हसे (अपक्ष), अजयकुमार अरुण लयचेट्टी (अपक्ष) हे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यापैकी अपक्ष उमेदवार निलेश म्हसे यांनी छिंदमविरोधात न्यायालयात धाव घेतली आहे. या निवडणूक काळात प्रशासनाने छिंदमला शहरातून हद्दपार केले होते. सोमवारी निकाल जाहीर झाल्यानंतर मंगळवारी छिंदमने त्यांच्या दिल्लीगेट येथील कार्यालयात येऊन प्रथम महापुरूषांना अभिवादन केले.