अहमदनगर : शस्त्राच्या धाकाने व्यापाऱ्याचे घर फोडले

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – शस्त्राचा धाक दाखवून जामखेड शहरातील शिवाजीनगर परिसरात राहणाऱ्या व्यापाराचे घर फोडून चोरट्यांनी लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला. आज पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेमुळे जामखेड शहरात घबराट पसरली आहे.
याबाबत माहिती अशी की, आज पहाटे तीन वाजता व्यापारी आसोशियशनचे अध्यक्ष रमेश जरे (रा. शिवाजी नगर, मराठी शाळे पाठीमागे) यांच्या राहत्या घरी चोरटे घुसले. चोरी करताना चोरट्यांनी आजुबाजुच्या घरांच्या कड्या लावल्या होत्या. घरातील सामानाची उचकापाचक करून चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले. चोरीची माहिती मिळताच जामखेड पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील, पोलीस कर्मचारी दिनानाथ पातकळ, बापू गव्हाणे आदींनी घटनास्थळी भेट दिली. श्वान पथकालाही घटनास्थळी पाचारण करण्यात आले आहे.