Ahmadnagar Crime News | भाऊ-बहिणीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना! भावाचा सख्ख्या चुलत बहिणीवर अत्याचार

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – Ahmadnagar Crime News | अहमदमनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात बहीण भावाच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. यामध्ये एका 20 वर्षीय भावाने त्याच्या 17 वर्षीय अल्पवयीन सख्ख्या चुलत बहिणीवर अत्याचार केले आहेत. त्याने वारंवार अत्याचार केल्यामुळे पीडित मुलगी गरोदर असल्याचे वैद्यकीय तपासात समोर आले आहे. (Ahmadnagar Crime News)

 

या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने संगमनेर तालुका पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.पोलिसांनी तक्रारीच्या आधारे आरोपी भावाविरुद्ध बलात्काराच्या कलमांसह पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.पीडित मुलीला संगमनेर जवळील लोणी येथील रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आलं आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी भावाला अटक केली आहे. (Ahmadnagar Crime News)

 

एकाच गावात राहणाऱ्या दोन कुटुंबातील एका भावाच्या 20 वर्षीय मुलाने नात्याने सख्खी चुलत बहिण असलेल्या 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर गेल्या सात-साडेसात महिन्यांत वारंवार अत्याचार केले.
यामधून पीडित मुलगी गरोदर राहिली आणि हा सगळा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.
संगमनेर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक डी. के. ढुमणे यांच्या मार्गदर्शनाखाली
पोलीस उपनिरीक्षक राहुल सानप या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

 

Web Title :- Ahmadnagar Crime News | ahmednagar sangamner crime news brother repeated molested of sister

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

IND vs AUS | ऑस्ट्रेलियाविरुद्ध शतक करून विराट कोहलीने केला ‘हा’ विक्रम; अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा फलंदाज

Vinay Aranha In ED Custody | विद्यार्थ्यांकडून भरमसाट फी घेणार्‍या विनय अरान्हाने उधळले बॉलीवूड स्टारवर पैसे; अनेक कारनामे ‘बाहेर’

Devendra Fadnavis | नैसर्गिक आणि गटशेतीच्या माध्यमातून शेतकऱ्याना संपन्न करणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस