Ahmadnagar Crime News | रात्री आडोशाला बसून दारू पिणे पडले महागात; काय आहे नेमके प्रकरण?

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – Ahmadnagar Crime News | अहमदनगर शहरातील केडगाव बायपास रोडवर रस्त्याच्या आडोश्याला मित्रासोबत दारू पित उभ्या असलेल्या इसमाचा अज्ञात चोरट्यांनी केलेल्या गोळीबारात मृत्यू झाल्याची घटना घडली. गुरुवारी मध्यरात्री ही घटना घडली. या चोरटयांनी चोरीच्या उद्देशाने गोळीबार करत तीन हजार रुपयांसह मोबाईल चोरी केला. शिवाजी होले असे गोळीबारात मृत्यू झालेल्या इसमाचे नाव आहे. रात्री उशिरा कोतवाली पोलीस ठाण्यात तीन अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (Ahmadnagar Crime News)

रात्रीच्या अंधारात अडोशाला दारू पित बसणे दोघांना चांगलेच महागात पडले. लुटारूंनी त्यांच्यावर हल्ला केला. लुटारूंच्या गोळीबारात एक जण ठार झाला. नगर शहराजवळील केडगाव बायपासवर गुरुवारी रात्री ही घटना घडली. ‘आम्ही येथे बसून दारु पिऊ का?’ असं विचारत दोघा आरोपींनी गप्पांना सुरुवात केली. त्यानंतर आणखी एकाच्या साथीने दोघांना लुटण्याचा प्रयत्न केला.या गोळीबारात शिवाजी किसन ऊर्फ देवा होले (रा. कल्याण रोड, नगर) हा इसम गोळी लागल्यामुळे जागीच ठार झाला तर त्याचा साथीदार अरुण नाथा शिंदे (वय 45 वर्ष) याच्या गळ्याला चाकू लावून लुटारूंनी तीन हजार रुपये आणि मोबाइल जबदस्तीने चोरून तिन्ही लुटारूंनी अंधारात पोबारा केला .

केडगाव बायपास रोडवर गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास शिवाजी होले व अरुण नाथा शिंदे हे दोघे एका बंद ढाब्याजवळ अंधारात दारु पित बसले होते. त्याचवेळी लुटारूंपैकी दोघेजण बायपासने पायी चालत त्यांच्याजवळ आले. आणि त्यांना विचारलं की, ‘आम्ही येथे बसून तुमच्यासोबत दारु पिऊ का?’ त्याला या दोघांनी होकार दिला. ‘आम्ही दोघे नेप्ती गावाचेच आहोत. तुम्ही बिनधास्त येथे बसून दारु प्या.’ असेही शिंदे यांनी त्या दोघांना सांगितले. त्यावर ते दोघे काहीही न बोलता तेथून निघून गेले. आणि पुन्हा थोड्या वेळात परत आले पण यावेळेस त्यांच्यासोबत अजून एक इसम होता. त्या तिघांपैकी एकाच्या हातात चाकू तर दुसऱ्याच्या हातात पिस्तूल होतं . (Ahmadnagar Crime News)

एकाने शिंदे यांच्या गळ्याला चाकू लावला आणि तुमच्याकडे असतील तेवढे सगळे पैसे काढून द्या,
अशी धमकी दिली. त्यावेळी शिंदे यांच्यासोबत असलेले शिवाजी होले यांनी लुटारूंना प्रतिकार करत रस्त्याकडे पळ काढला.
परंतु पिस्तूलधारी व्यक्तीने होले यांच्यावर गोळी झाडली आणि ती लागून होले यांचा मृत्यू झाला.
लुटारूंनी शिंदे यांच्या मानेला चाकू लावत तीन हजार रुपये व मोबाईल काढून घेतला .
त्यांच्या डोळ्यात मिर्ची पावडर फेकून तिघे लुटारू तेथून निघून गेले.
कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेची माहिती मिळताच कोतवाली पोलीस स्टेशनचे सर्व पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी
धाव घेतली.

Web Title :- Ahmadnagar Crime News | ahmednagar two accused open fire killing one after asking to have drink together

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Akshay Kumar | अखेर अक्षय कुमारने कॅनडाचे नागरिकत्व नाकारले; ‘या’ देशाच्या नागरिकत्वासाठी केला अर्ज

Nayanthara | साऊथ सुपरस्टार नयनतारा अभिनय सोडणार? लग्न- मुलांच्या जन्मानंतर तिने केला मोठा खुलासा

Prajakta Mali | ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीची लेडी क्रश आहे प्राजक्ता माळी; प्राजक्ता माळीची लेसबियन पार्टनर व्हायची इच्छा केली व्यक्त