Ahmadnagar Crime News | बोअरवेलमध्ये पडून 5 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू

Advt.

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – Ahmadnagar Crime News | अहमदनगरमधील कोपर्डीमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये 15 फुट खोल बोअरवेलमध्ये पडून एका 5 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे. सागर बुधा बरेला असे या अपघातात मृत पावलेल्या चिमुकल्याचे नाव आहे. सोमवारी सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास हि घटना घडली आहे. रात्री उशीरापर्यंत त्याला बोअरवेलमधून बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु होते. मात्र या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. (Ahmadnagar Crime News)

काय आहे नेमके प्रकरण?
मृत सागरचे कुटुंब उसतोडणीसाठी मध्यप्रदेशमधून महाराष्ट्रात आले होते. कोपर्डी येथील संदीप सुद्रिक यांच्या ऊसाच्या शेतात ते कामाला होते. यादरम्यान सोमवारी संध्याकाळी चार वाजताच्या दरम्यान सागर खेळत असताना शेतातील बोरवेलमध्ये पडला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस, प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच उपजिल्हा रुग्णालयाची टीम, कर्जत नगरपंचायतचे अग्निशमन दल आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. (Ahmadnagar Crime News)

यानंतर सागर ज्या ठिकाणी पडला त्याच्या समांतर दोन ठिकाणी जेसीबीच्या सहाय्याने खोदकाम करण्यात आले. अखेर त्याला रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास बाहेर काढण्यात आले मात्र त्याअगोदर त्याचा मुत्यू झाला होता. २०१७ मध्येदेखील अहमदनगरमध्ये अशीच एक घटना घडली होती. त्यावेळी 7 वर्षांचा एक मुलगा बोअरवेलमध्ये पडला होता. त्याचाही या दुर्घटनेत मृत्यू झाला होता. आता पुन्हा एकदा अशीच घटना घडल्याने नागरिकांनी प्रशासनावर संताप व्यक्त केला आहे.

Web Title :- Ahmadnagar Crime News | five year old boy died after fall in borewell ndrf rescue operation failed

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Immune System In Summer | ‘हे’ 5 फूड उन्हाळ्यात इम्युनिटी करू शकतात कमजोर, डाएटमधून आजच काढा बाहेर; जाणून घ्या

Ajit Pawar On Shinde-Fadnavis Govt | आदिवासी महिलेला विवस्त्र करुन मारहाण प्रकरणी विरोधी पक्षनेते अजित पवारांनी सरकारला धरले धारेवर

MP Supriya Sule | खडकवासला आणि उजनी धरणातील प्रदूषण रोखण्यासाठी तातडीने उपयोजना करा