अहमदनगर : राजकीय हेतूने खोटे गुन्हे, शिवसेना माजी शहरप्रमुखाचा आरोप

अहमदनगर: पोलीसनामा ऑनलाइन – माजी महापौर भगवान फुलसौंदर यांच्यावर दाखल झालेला गुन्हा खोटा असून, तो राजकीय हेतूने दाखल केलेला आहे. नगर शहर शिवसेना भगवान फुलसौंदर यांच्या पाठीशी आहे. या गुन्ह्याचा सखोल तपास झाला, तर फुलसौंदर यांच्यावर अन्याय झाल्याचे उघड होईल, असे शिवसेना माजी शहरप्रमुुख संभाजी कदम यांनी आज पत्रकारांशी बोलताना सांगितले.
कदम म्हणाले की, बुरुडगाव रोड भागात काही विशिष्ट टोळ्या असून, त्या या भागात नवीन घर बांधणाऱ्या नागरिकांना नेहमीच त्रास  देत आलेले आहेत. काही विशिष्ट नेतेमंडळी अशा लोकांची संगमात करून नंतर ते प्रकरण मिटवण्यात प्रसिद्ध आहेत. शिवसेनेला कमी दाखवण्यासाठी काही लोक शहरात राजकारण करत असून, अनेक वेळा खोटे गुन्हे दाखल करण्यात येत आहेत ते कुठेतरी थांबायला पाहिजे.
उद्या ‘एसपीं’ना भेटणार
माजी महापौर भगवान फुलसौंदर यांच्यावर खोटे गुन्हे दाखल झालेले रद्द करावा, या मागणीसाठी सोमवारी पोलीस अधीक्षक ईशू सिंधू यांना समक्ष भेटून निवेदन देणार असल्याचेही संभाजी कदम सांगितले आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

You might also like