अहमदनगर : पोटनिवडणुकीत पालकमंत्र्यांना ‘धक्का’

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – कर्जत तालुक्यातील कोरेगाव पंचायत समिती गणाच्या निवडणुकीत भाजप उमेदवाराचा पराभव करून काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या मनीषा जाधव या विजयी झाल्या. त्यामुळे पालकमंत्री राम शिंदे यांना मोठा धक्का बसला आहे गोरेगावकर हा भाजपचा ताब्यात होता. राम शिंदे यांना त्यांच्याच मतदारसंघात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने धोबीपछाड केले आहे.

कोरेगाव पंचायत समिती गणासाठी काल मतदान झाले होते. आज कर्जत तहसील कार्यालयामध्ये मतमोजणी झाली. कोरेगाव पंचायत समिती गणावर भाजपचे वर्चस्व होते. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या कार्यकर्त्यांनी भाजपचे वर्चस्व मोडून काढत ही जागा खेचून आणली. मनीषा दिलीप जाधव यांनी भाजप-शिवसेना युतीच्या उमेदवार शशिकला हनुमान शेळके यांचा पराभव केला.

कर्जत-जामखेड मतदारसंघातून शरद पवार यांचे नातू रोहित पवार हेही इच्छुक आहेत. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून ते मतदारसंघात कार्यकर्त्यांची जुळवाजुळव करीत आहेत. कोरेगाव पंचायत समिती गण हा भाजपचा ताब्यातून घेऊन त्यांनी पालकमंत्री राम शिंदे यांना मोठा धक्का दिला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप झालेला पराभव पालकमंत्री शिंदे यांना आत्मचिंतन करायला लावणारा आहे.
आरोग्य विषयक वृत्त-
रक्ताची गाठही ठरू शकते मृत्यूचे कारण ; वेळीच व्हा सावध
पावसाळ्यात त्वचेची घ्या अशी ‘काळजी’
सतत तणावग्रस्त राहिल्यास चेहऱ्याची चमक फिकी पडते
धक्कादायक ! मनुष्यांच्या कवटीतून बाहेर येत आहेत शींग