Ahmadnagar News : देवेंद्र फडणवीसांची मध्यस्थी यशस्वी, अण्णा हजारेंचं उपोषण मागे

राळेगणसिद्धी : पोलीसनामा ऑनलाईन – केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आमरण उपोषण करणार होते. मात्र, त्यांनी उपोषण करणार नसल्याचे जाहीर केले. कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांकडून जोरदार विरोध केला जात आहे. पण दिल्लीतील लाल किल्ल्यावर झालेल्या हिंसाचारानंतर शेतकरी आंदोलन संपण्याच्या मार्गावर होते. याच आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी अण्णा हजारे मैदानात उतरणार होते. पण तत्पूर्वी त्यांनी उपोषण न करण्याचा निर्णय घेतला.

केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलाश चौधरी आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अण्णा हजारे यांच्या राळेगणसिद्धी या गावी भेट घेतल्यानंतर त्यांना उपोषण न करण्याची विनंती केली. अण्णा हजारे यांनी ही विनंती मान्य केली.

अण्णा हजारे उद्या करणार होते आमरण उपोषण
30 जानेवारी या दिवशी अण्णा हजारे हे आमरण उपोषण करणार होते. मात्र, ते आता उपोषण करणार नाहीत हे स्पष्ट झाले आहे.