‘त्या’ पोलीस निरीक्षकाची वर्दीही गेली चोरीला

नगर: पोलीसनामा आॅनलाईन

सव्वासहा लाख रुपयांच्या फसवणुकीला बळी पडलेले पोलीस निरीक्षक गोविंद अोमासे यांची खाकी वर्दी देखील चोरीला गेल्याची गंभीर घटना घडली आहे. याप्रकरणी शेवगाव पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फसवणूक झाल्यानतंर काही तासाच्या आतमध्येच अोमासे यांची खाकी वर्दी चोरीला गेल्याने जिल्हा पोलीस दलात उलट-सुलट चर्चांना उधान आलं आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, अोमासे हे शेवगाव शहरात एका भाड्याच्या खोलीत वास्तव्यास आहेत. रविवार (दिनांक. 12 आॅगस्ट) रोजी सकाळी सात वाजता त्यांची सरकारी वर्दी चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. यानंतर अोमासे यांनी शेवगाव पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाच्या विरोधात फिर्याद दाखल केली.
[amazon_link asins=’B0756Z43QS’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’8265517b-9ed9-11e8-9c73-8fc947b02bbe’]