अहमदनगर : शेततळयात बुडून माय-लेकीसह तिघींचा मृत्यू

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – शेततळ्यातून बुडून आज तिघींचा दुर्देवी मृत्यू झाला. मयतांत माय-लेकी आहेत. कर्जत तालुक्यात ही घटना घडली. अनिता शरद पांडुळे (वय 30), सायली शरद पांडुळे (वय 10), सोनाली शरद पांडुळे (वय 7) ही मयतांची नावे आहेत. आज सकाळी अनिता पांडुळे या घरातील सर्वांच्या अंघोळी झाल्यानंतर सर्व कपडे घेऊन शेततळ्यावर धुण्यासाठी घेऊन गेल्या.

त्यावेळी त्यांनी घरामध्ये कोणी नसल्यामुळे त्यांच्या दोन मुलींना सोबत घेतले होते. अनिता पांडुळे या कपडे धुण्याचे काम करत असताना सायली व सोनाली या दोघी खेळत खेळत शेततळ्याच्या पाण्याजवळ गेल्या. पाय घसरून पाण्यात पडल्या. दोघी पाण्यात पडल्याच्या आवाजाने अनिता या धावत शेततळ्याच्या पाण्याकडे गेल्या. दोन्ही मुली पाण्यात बुडत असल्याचे पाहून त्यांनी कोणताही विचार न करता शेततळ्यांत उडी मारली. त्यात बुडून तिघींचाही मृत्यू झाला.

तिघींचेही मृतदेह काढून कर्जत येथील उपजिल्हा रुग्णालयांमध्ये आणले. याप्रकरणी कर्जत पेलिस ठाण्यात अकस्मात मयताची नोंद केली आहे. उत्तरीय तपासणी करून सायंकाळी मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. याा घटनेमुळे घुमरी गावात शोककळा पसरली आहे.

सिने जगत –

#Video : ‘नौटंकी’बाज राखी सावंतकडून ‘वाढीव’ व्हिडिओ शेअर, भडकलेल्या युजर्सने केलं ‘ट्रोल’

सार्वजनिक कार्यक्रम चालु असताना ‘त्या’ अभिनेत्रीचा ड्रेस सटकल्याने वातावरण ‘गरम’

ऋतिकचा ‘हा’ जुना फोटो व्हायरल ; सोबत असलेली ‘ती’ लहान मुलगी आजची टॉपची अभिनेत्री

‘असे’ काय केले सारा अली खानने की, चाहते म्हणाले,’लाल मिरची’

Loading...
You might also like