देवेंद्र फडणवीस सरकार निकम्मं आहे ; उद्धव ठाकरेंचा संताप

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन
शिवसैनिकांच्या हत्येवर संताप व्यक्त करताना नामर्दाच्या अवलादीला ठेचून काढू असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत म्हटले आहे. उद्धव ठाकरे अहमदनगरच्या दौऱ्यावर असून त्यांना हत्या झालेल्या शिवसैनिकांच्या कुटुंबियांची भेट घेतली. शिवसेनेकडून ठुबे आणि कोतकर यांच्या कुटुंबांची जबाबदारी आम्ही घेतली आहे. त्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी १५ लाख ५० हजाराची आर्थिक मदतही देण्यात आली आहे. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी हत्येवर संताप व्यक्त करताना महाराष्ट्राला वेगळा गृहमंत्री पाहिजे अशी मागणी केली.

महाराष्ट्राचे बिहार झाल्यासारखे वाटते.
या पत्रकार परिषदेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राची कायदा आणि सुव्यवस्था बिहारपेक्षा वाईट झाल्यासारखे वाटत आहे. आमदार कार्डिले यांची अटक गांभीर्याने करणे आवश्यक होते. मंगळवारीच कर्डिलेंचा जामीन मिळाल्याने ठाकरेंचा यावरुनही संताप व्यक्त केला.

”नामर्दाच्या अवलादीला ठेचून काढू. पक्षात गुंडाना घ्या आणि सत्ता स्थापन करा असा मूलमंत्र घेऊन सत्ता स्थापन केली असेल तर या देशाला अच्छे दिन येतील असे वाटत नाही असा टोला यावेळी त्यांनी भाजपाला मारला.

शिवसैनिक हत्या प्रकरण : उज्वल निकमांनी करावे असे वाटते : उद्धव ठाकरे
शिवसेनेला कायदा हातात घेऊन प्रतिकार करावा लागला तर शिवसेना रस्त्यावर उतरेल असा इशारा देताना देवेंद्र फडणवीस सरकार निकम्मे आहे अशी टीकाही त्यांनी केली. राज्याला वेगळा गृहमंत्री मिळाला पाहिजे अशी मागणी करताना शिवसेनेच्या मंत्र्यांना अधिकार दिले जात नाहीत यावरुनही त्यांनी नाराजी व्यक्त केली.