61 वर्षाच्या वयोवृद्धवर ‘हनी ट्रॅप’; हॉटेलमध्ये महिलेने केली 13 लाख रुपयांची मागणी

अहमदाबाद: शहरात हनी ट्रॅपचे नवीन प्रकरण समोर आले आहे. या महिलेने ६१ वर्षीय वयोवृद्धाकडे १३ लाख रुपयांची मागणी केली आहे. पैसे न दिल्यास पोलीस केस करण्याची धमकी महिलेने दिली आहे. महिलेने वृद्ध व्यक्तीच्या विरोधात तक्रार नोंदवली आहे. पोलिसांनी ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरु केला आहे. अलीकडेच शहरात हनी ट्रॅपचे तीन-चार प्रकरणे समोर आली आहेत.

६१ वर्षाचे वयोवृद्ध बापूनगरमध्ये पत्नीसोबत राहतात. त्यांना तीन मुली आणि एक मुलगा आहे. काही दिवसांपूर्वी कॉल करून एका महिलेने त्यांच्याकडून नोकरीची मागणी केली होती. वृद्ध व्यक्तीला महिलेने सांगितले की त्या मेघनगरमध्ये भार्गव रोडवर राहते. नंतर वाढदिवसाच्या निम्मिताने त्या महिलेने वृद्ध व्यक्तीस हॉटेलमध्ये बोलावले.

वृद्ध व्यक्तीने सांगितले की हॉटेलच्या खोलीमध्ये अचानक ती महिला आक्षेपार्हपणे वागू लागली. त्यानंतर तिने १३ लाख रुपयांची मागणी केली आणि या वृद्ध व्यक्तीला बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिली. दरम्यान, राजेश नावाच्या व्यक्तीने सांगितले की तो एक लाख रुपयांत हा विषय मिटवेल.

नंतर बापूनगर पोलिसांचे काही लोक आले आणि म्हणाले की वृद्धाविरुद्ध बलात्काराची तक्रार आहे. याप्रकरणी बापूनगर पोलिसांनी आमिषा कुशवाह, विकास गोहिल, राजेश वाधेर, अल्पा आणि आरती यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. या प्रकरणाची सध्या चौकशी सुरु आहे. पोलिसांना आशा आहे की लवकरच या खटल्याचा निकाल लागेल.