बाजारात आंब्याचा ज्यूस पिणार्‍यांनो सावधान ! अहमदाबादमधील संशोधनात समोर आले आश्चर्यकारक निष्कर्ष

अहमदाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – जर तुम्ही बाजारात मिळणार्‍या डब्बाबंद आंब्याच्या ज्यूसचे सेवन करत असाल तर सावध व्हा. कंझ्युमर एज्युकेशन रिसर्च सेंटरद्वारे करण्यात आलेल्या संशोधनात आर्श्चकारक सत्य समोर आले आहे. आंब्याच्या ज्यूसमध्ये उच्च स्तरीय पोषकतत्व आणि साखर असते, जे तुम्हाला आजारी पाडू शकते. बाजारात विकल्या जाणार्‍या आंब्याच्या रसाचा स्वाद जेवढा चांगला असतो, तो तेवढाच हानिकार सुद्धा असतो. जर तुम्ही बाजारात प्रसिद्ध ब्रँडचा आंब्याचा ज्यूस सेवन करत असाल तर तुम्हाला विशेष प्रकारे सतर्क राहण्याची आवश्यकता आहे.

एका व्यक्तीला एका दिवसात केवळ 20 ते 30 ग्रॅम साखरेची आवश्यकता असते, परंतु बाजारात उपलब्ध रसांमध्ये मोठ्या प्रमाणात फुड कलर आणि साखर मिसळली जाते, जी आरोग्यासाठी हानिकारक आहे. सीईआरसीच्या मुख्य महाव्यवस्थापक आनंदिता मेहता यांनी म्हटले की, त्यांच्या कंपनीद्वारे 10 पेक्षा जास्त ब्रँडवर संशोधन करण्यात आले, ज्यामध्ये बहुतांश नमुन्यांमध्ये हानिकारक घटक सापडले.

संशोधनातून समजले की, जर तुम्ही बाजारातून खरेदी करून मँगो ज्यूस पित असाल तर तो तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकतो. बहुतांश ज्यूसमध्ये प्रत्येक 100 मिली लीटरमध्ये 20 ग्रॅम पेक्षा जास्त साखर असते. अशावेळी बाजारात मिळणारा डब्बाबंद ज्यूस आरोग्याला हानिकारक ठरू शकतो. संशोधनातून समजले आहे की, आंब्याच्या रसात डाय बेस कलर्स डेटाजीन, सनसेट यलोच्या शिवाय खराब पाण्याची मात्रा जास्त असते, ज्याचा परिणाम आरोग्यावर होतो. ज्यांना अस्थमा आणि मधुमेह आहे त्यांच्यावर जास्त प्रभाव पडतो.

याशिवाय बाजारात मिळणार्‍या आंब्यांच्या गुणवत्तेवर सुद्धा संशोधन करण्यात आले. यात सांगण्यात आले की, सामान्य माणसांनी कॅल्शियम कार्बाईडने पिकवलेले आणि नैसर्गिकरित्या पिकवलेले आंबे कसे ओळखावेत. सीईआरसीनुसार प्रतिबंधित कार्बाईडने पिकवलेले आंबे इतर आंब्यापेक्षा चमकदार दिसतात.