फसवणूक करून दोन लग्न करणारे आरोपी IAS दहियांनी पिडीत महिलेचं लग्न झाल्याचं सांगितलं

नवी दिल्ली :वृत्तसंस्था – फसवणूक करून दोन लग्न केलेल्या प्रकरणातील निलंबित आयएएस अधिकारी याने या प्रकरणात नवीन खुलासा केला आहे. या प्रकरणातील पीडित मुलगी हि विवाहित असल्याचे त्याने म्हटले आहे. याविषयी बोलताना त्याने म्हटले कि, पीडिता हि आधीपासून विवाहित असून तिला दहा महिन्यांची मुलगी असून तो या मुलीचा पिता नाही. त्यानंतर आता पीडिता लीनू सिंह हिने या अधिकाऱ्याच्या विरोधात नार्को टेस्ट आणि डीएनए चाचणी करण्यासाठी याचिका दाखल केली आहे.

गुजरात सरकारच्या चौकशी समितीला आपल्या 300 पानांच्या खुलाशात त्याने या तरुणीवर ब्लॅकमेल करण्याचा आरोप केला आहे. त्याचबरोबर तिला मी खूप पैसे दिले असून मी तिच्याबरोबर फार कमी कालावधीसाठी राहिलो आहे. तिने सोशल मीडियावर मेडिकलची विद्यार्थिनी म्हणून खोटी आयडी बनवली होती. त्यामुळे प्रभावित होऊन मी तिच्याजवळ गेलो होतो. त्याचबरोबर मी तिच्याशी लग्न केले नसल्याचे देखील दहिया यांनी सांगितले.

हे प्रकरण समोर आल्यानंतर गुजरात सरकारने या प्रकरणाचा तपास करण्यासाठी एक उच्चस्तरीय समिती नेमली आहे. तपासत प्राथमिक दृष्ट्या या समितीने गौरव दहिया यांना पीडितेची फसवणूक केल्याप्रकरणी दोषी ठरवले होते. त्यानंतर आता पीडितेने कोर्टात नार्को टेस्ट आणि डीएनए चाचणी करण्यासाठी याचिका दाखल केली आहे.

दरम्यान, 13 ऑक्टोबर 2017 रोजी पहिल्यांदा गौरव दहिया आणि पीडिता लीनूसिंह सोशल मीडियावरून एकमेकांच्या संपर्कात आले होते. त्यानंतर पीडितेने दिलेल्या माहितीनुसार, फेब्रुवारी 2018 मध्ये त्याने तिरुपती बालाजी मंदिरात तिच्याशी विवाह देखील केला होता. तसेच नोव्हेंबर 2018 मध्ये तिने एका मुलीला जन्मदेखील दिला होता. त्यानंतर यावर्षी जुलै महिन्यात तिने आयएएस अधिकाऱ्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर गुजरात सरकारने त्यांना निलंबित केले होते.

Visit : Policenama.com 

शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी
बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या