अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेन प्रोजेक्टसाठी निविदा मागवल्या, ‘या’ स्वदेशी कंपन्या शर्यतीत

नवी दिल्ली : नॅशनल हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशनने बुधवारी अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेन प्रोजेक्टसाठी पहिल्या टेंडरसाठी निविदा मागवल्या आहेत. प्रोजेक्टच्या सुमारे 237 किमी अंतरावर 20,000 कोटी रूपयांच्या खर्चाच्या निर्मितीसाठी कंसोर्टियम आणि लार्सन अँड ट्यूब्रोने निविदा दिली आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, एनएचएसआरसीएलने म्हटले की, या प्रोजेक्टचे हे सर्वात मोठे टेंडर आहे, ज्याअंतर्गत गुजरातच्या वापी आणि वडोदरादरम्यान बुलेट ट्रेन अलायन्मेंटचा 47 टक्के परिसर कव्हर होईल. याअंतर्गत कॉरिडोरमध्ये 4 स्टेशन वापी, बिलिमोरा, सूरत आणि भरूचची सुद्धा उभारणी केली जाईल.

या कंपन्यांनी दिल्या निविदा
एनएचएसआरसीएलने सांगितले की, या प्रतिस्पर्धी बिडिंगमध्ये तीन बिडर्सने भाग घेतला आहे, ज्यामध्ये एकुण सात इन्फ्रास्ट्रक्चर कंपन्या सहभागी आहेत. एफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर, इरकॉन इंटरनॅशनल आणि जेएमसी प्रोजेक्ट्स इंडियाने एकत्रित एक निविदा दिली आहे. अशाच प्रकारे एनसीसी-टाटा प्रोजेक्ट-जे कुमार इन्फ्रा प्रोजेक्ट्सने एकत्रित निविदा दिली आहे. लार्सन अँड टूब्रोने एकट्याने निविदा भरली आहे.

83 टक्के जमीनीचे अधिग्रहण
या 237 किमी लांबीच्या कॉरिडोरमध्ये 24 नद्या आणि 30 रोड क्रॉसिंग येतील. हा संपूर्ण भाग गुजरातमध्ये आहे, जेथे 83 टक्केपेक्षा जास्त भूसंपादन झाले आहे. रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी राज्यसभेत सांगितले होते की, मार्च 2020च्या अगोदर भूसंपादनाचे काम पूर्ण होणार होते, परंतु महाराष्ट्रात काही अडचणी आल्याने ते होऊ शकले नाही. हा पूर्ण प्रोजेक्ट 508 किमीचा आहे, ज्याचा सुमारे 349 कि.मी. भाग गुजरातमध्ये आहे.

90 हजारपेक्षा जास्त लोकांना रोजगार
नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशननुसार, या एका प्रोजेक्टमधून सुमारे 90,000 लोकांना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार मिळणार आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like