खळबळजनक ! शरीरात ‘भूत’ असल्याचं सांगितलं, पतीसोबत ‘सेक्स’ करण्यास महिलेला बंदी

अहमदाबाद : पोलीसनामा ऑनलाइन –  तुझ्या शरीरात ‘भुताचा आत्मा’ असल्याचे सांगून पतीसोबत शरीरसंबंध ठेवण्यास बंदी घातल्याचा एक विचित्र असा प्रकार गांधीनगर परिसरात समोर आला आहे. या प्रकरणी महिलेने आपल्या सासऱ्याविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पतीसोबत शरीसंबंध ठेवले तर, तुझ्या शरीरातील आत्मा मुलाच्या शरीरात प्रवेश करीन, असे सासऱ्याचे मत असल्याचे, महिलेने तक्रारीत सांगितलं आहे.

एफआयआर मध्ये दिलेल्या माहितीनुसार, पीडित ४३ वर्षीय महिला गांधीनगर येथील सेक्टर २२ मध्ये आपल्या पतीसोबत राहते. तिने सांगितले की सासऱ्याच्या मतानुसार ‘माझ्या शरीरात भुताचा आत्मा आहे. म्हणून पतीसोबत शरीरसंबंध ठेवण्यास बंदी घालण्यात आली आहे. जर पतीसोबत शरीरसंबंध ठेवले तर तुझ्या शरीरातील आत्मा मुलाच्या शरीरात प्रवेश करीन’ असे महिलेने तक्रारीत नमूद केले. तसेच या गोष्टीला विरोध केला असता माझा मानसिक छळ करण्यास सुरुवात केली. मला पतीने आणि सासरच्या मंडळींनी मारहाण केली, असा आरोप तिने तक्रारीत केला. सासऱ्याने विनयभंग केला. सासूही त्यासाठी त्याला मदत करते, असा आरोप तिने लावला.

मला जबरदस्तीने घरातून १० मार्च रोजी हाकलून लावले. मग काही दिवसांनी घरी घेऊन जाण्यासाठी त्यांच्या कुटुंबातील लोक तयार झाले होते. पण सासरच्या मंडळींनी घरी येण्यास नकार दिला. तसेच पोलिसात गेली तर बघून घेईन अशी धमकी सुद्धा सासरच्या लोकांनी दिल्याचं महिलेने सांगितलं. या प्रकरणी महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, पोलिसांनी सासरच्या मंडळींविरोधात कौटूंबिक हिंसाचार प्रकरणी गुन्हा नोंद केला असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like