अहमदनगरमध्ये मानाच्या १२ गणपती मंडळांचा मिरवणुकीवर बहिष्कार

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन

दहा दिवसानंतर आज अनेक गणपती मंडळे गणपती विसर्जित करणार आहेत. नगर शहरात १३ मानाचे गणपती असून या मंडळांपैकी १२ मंडळांनी मिरवणुकीवर बहिष्कार टाकला आहे. डीजे वाजविण्यास बंदी घातल्याने हा बहिष्कार टाकण्यात आला आहे. विसर्जन मिरवणुकीत डीजे वाजवण्यावर उच्च न्यायालयाने बंदी आणली आहे. त्यामुळे नगरच्या प्रशासनाने सुध्दा मिरवणुकीमध्ये डीजे वाजवण्याला परवानगी नाकारली आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’da0a2cf0-bee8-11e8-9a40-f539e2e6e89c’]

मिरवणुकीत आवाजाची मर्यादा पाळण्याची हमी दिल्यानंतरही प्रशासनाने डीजे वाजवण्याची परवानगी दिली नाही. त्यामुळे १२ मानाच्या गणपती मंडळांनी मिरवणुकीवरच बहिष्कार टाकला आहे. ध्वनी प्रदुषणावर आळा घालण्यासाठी न्यायालयाने मिरवणुकांमध्ये डीजे वाजवण्यावर बंदी आणलेली आहे. डीजे वाजविण्यावर पुणेसह अहमदनगर आणि इतर जिल्ह्यात बंदी घालण्यात आल्याने गणेशभक्तांमध्ये सध्या नाराजी आहे.

जीपीएस सिस्टीमद्वारे मिरवणूकीवर वॉच : पोलीस आयुक्त डॉ. के व्यंकटेशम