धक्कादायक ! पोलीस निरीक्षकाने पिस्तूलाच्या धाकाने केला 26 वर्षीय तरुणाीवर बलात्कार, प्रचंड खळबळ

पोलिसनामा ऑनलाईन – तरुणीचा छळ करून तिच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी नगर शहरातील कोतवाली पोलीस ठाण्याचा तत्कालीन निरीक्षक आणि सध्या आर्थिक गुन्हे शाखेत कार्यरत असलेले पोलीस अधिकारी विकास वाघ याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

तरुणी 2019 मध्ये तक्रार देण्याच्या निमित्ताने कोतवाली पोलीस ठाण्यात आली होती. त्यावेळी विकास वाघ याने तिच्याशी ओळख वाढवली. काही दिवसानंतर वाघ पीडित तरुणीच्या घरी गेला. तिच्या असाह्यतेचा फायदा घेऊन रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून अत्याचार केला. याबाबत पीडित तरूणीने तक्रार दाखल केली होती. त्यानंतर वाघ याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तरुणीने प्रतिकार केला तेव्हा वाघ याने तिला कंबरपट्ट्याने जबर मारहाण केली. ’ही बाब कुणाला सांगितली तर तुझे कुटुंब संपवून टाकील’ अशी धमकी दिली. त्यानंतर वाघ याने पीडितेवर वेळोवेळी कधी हॉटेल तर कधी कोतवाली पोलीस निरीक्षकाच्या निवासस्थानी अत्याचार केला. पीडित तरुणी गरोदर राहिल्याची बाब वाघ याला समजल्यानंतर त्याने 26 सप्टेंबर 2019 ला तिला बंगल्यावर नेऊन मारहाण करत जबरदस्तीने गर्भपाताच्या गोळ्या खाऊ घातल्या. त्रासाला कंटाळून पीडितेने जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे तक्रार देण्याचा निर्णय घेतला. ही बाब विकास वाघ याला समजल्यानंतर त्याने पीडितेला एमआयडीसी परिसरात नेऊन धमकी दिली.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like