Ahmednagar ACB Trap | शिक्षकाकडून लाच मागणाऱ्या महिला अधिकाऱ्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या बेड्या

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाने पत्नीचे निधन झाल्याने तिच्या रुग्णालय खर्चाची रक्कम मिळावी, यासाठी शिक्षकाने जिल्हा परिषदेत सर्व कागदपत्रांची पूर्तता करत अर्ज केला. पण या कामासाठी त्यांच्याकडे वरिष्ठ सहाय्यक अधिकाऱ्याने 5000 रुपयांची लाच (Ahmednagar ACB Trap) मागितल्याचा प्रकार उघड झाला आहे. याप्रकरणी अहमदनगर जिल्ह्याच्या लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी कारवाई करत लाचखोर महिला अधिकाऱ्यास (Ahmednagar ACB Trap) ताब्यात घेतले आहे.

 

तक्रारदार जिल्हा परिषद शिक्षक यांच्या पत्नी जून २०२१ मध्ये कोरोनाने आजारी होत्या. त्यांनी त्यांना उपचारासाठी अहमदनगरमधील खासगी रुग्णालयात दाखल केले होते. दुर्दैवाने उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर तक्रारदार यांनी पत्नीचे उपचाराचे बील स्वतः भरले. त्यानंतर हे बील जिल्हा परिषदेतून मंजूर होऊन मिळण्यासाठी सर्व आवश्यक कागदपत्रांसह पंचायत समिती श्रीरामपूरमार्फत जुलै 2021 मध्ये दाखल केले. (Ahmednagar ACB Trap) त्यानंतर हे बील मंजूर करण्यासाठी वरिष्ठ सहाय्यक चंदा चंद्रकांत ढवळे Chanda Chandrakant Dhavale (प्राथमिक शिक्षण विभाग, वर्ग – 3 जि.प. अहमदनगर) यांनी 5000 रुपयांची लाच मागितली. या प्रकाराची तक्रार लाचलुचपत विभाग अहमदनगर यांच्याकडे करण्यात आली होती.

 

त्यानुसार दि. 07 नोव्हेंबर रोजी जिल्हा परिषद शिक्षण विभाग येथे सापळा रचत लाचलुतपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी साक्षीदार यांच्यासमोर लाच मागणी पडताळणी केली. त्यात चंदा चंद्रकांत ढवळे यांनी 5000 रुपयांची मागणी करुन ही रक्कम स्वाकारण्याची तयारी दर्शविली. त्यावेळी सापळा पथकाने त्यांना अटक केली.

सदरची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक सुनील कडासने (ACB SP Sunil Kadasane),
अपर पोलीस अधीक्षक नारायण न्याहळदे (Addl SP Narayan Nyahalde) पोलीस उपअधीक्षक नरेंद्र पवार (DySP Narendra Pawar)
तसेच सापळा अधिकारी पोलीस उपअधीक्षक हरीष खेडकर (DySP Harish Khedkar),
सहायक सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक गहिनीनाथ गमे (PI Gahininath Game), आणि शरद गोरडे (PI Sharad Gorade)
यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा पथक पोलीस हवालदार संतोष शिंदे, विजय गंगूल, पोना रमेश चौधरी,
पोलीस अंमलदार रविंद्र निमसे, वैभव पांढरे, बाबासाहेब कराड, महिला पोलीस नाईक संध्या म्हस्के,
राधा खेमनर चालक हारून शेख यांनी केली.

 

Web Title :- Ahmednagar ACB Trap | Ahmednagar ACB Trap Chanda Chandrakant Dhavale Arrested While Taking Bribe

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Shraddha Walkar Murder | श्रद्धा वालकर हत्या प्रकरणातील आरोपी न्यायालयात हजर; फाशीसाठी आवारात वकिलांचा राडा

Rahul Gandhi | ‘ते घाबरत नसते, तर त्यांनी कधीच या पत्रावर सही केली नसती’; राहुल गांधींची सावरकरांवर पुन्हा टीका

Chandrapur Murder Case | तीन महिन्याने बाहेर आला खुनाचा कट, मुलीने कॉल रेकॉर्डिंग ऐकल्यामुळे आई अटकेत