Ahmednagar ACB Trap | 50 हजार रुपये लाच मागणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यावर एसीबीकडून FIR

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – अधिकृत परवाना असलेले देशी दारूच्या दुकानदाराकडे (Country Liquor) 50 हजार रुपये लाचेची मागणी (Demanding a Bribe) करुन तडजोडीत 30 हजार रुपये स्विकारण्याची तयारी दर्शवणाऱ्या पोलीस कॉन्स्टेबलवर (Police Constable) अहमदनगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Ahmednagar ACB Trap) गुन्हा (FIR) दाखल केला आहे. रामेश्वर सिताराम काळे Rameshwar Sitaram Kale (वय-35) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या पोलीस कॉनस्टेबलचे नाव आहे. अहमदनगर एसीबीच्या (Ahmednagar ACB Trap) पथकाने 12 जानेवारी रोजी पडताळणी केली आहे. रामेश्वर काळे यांच्यावर वैजापूर पोलीस ठाण्यात (Vaijapur Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत गंगापूर तालुक्यातील रघुनाथनगर येथील 52 वर्षाच्या व्यक्तीने अहमदनगर एसीबीकडे (Ahmednagar ACB Trap) तक्रार केली आहे. रामेश्वर काळे हे वैजापूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या गाडीवर चालक म्हणून कार्यरत आहेत. तक्रारदार यांचे भावाच्या नावावर नेवरगाव येथे अधिकृत परवाना असलेले देशी दारूचे दुकान आहे. दुकानाचे सर्व कामकाज तक्रारदार हे पाहतात. 18 डिसेंबर 2022 रोजी रामेश्वर काळे यांनी तक्रारदार यांची टाटा सुमो गाडी देशी दारूचे 12 बॉक्स घेऊन जात असताना विरगांव पोलीस स्टेशन (Virgaon Police Station) हद्दीत पकडली होती. गाडीमधील दारुचे बॉक्स व गाडी जप्त करुन गाडीमध्ये हजर असलेले दोन व्यक्ती व दुकानाचे मालक या नात्याने तक्रारदार यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला होता.

यानंतर रामेश्वर काळे यांनी तक्रारदार यांना फोन करुन वैजापूर येथे बोलावून घेतले. तुमच्या विरुद्ध बेकायदेशीर रित्या देशी दारू वाहतूक करण्याचा गुन्हा दाखल झाला आहे. तुमचा दुकानाचा परवाना रद्द करण्याचा प्रस्ताव उप विभागीय पोलीस अधिकारी यांचे कार्यालया मार्फत पुढे न पाठवण्यासाठी 50 हजार रुपयांची लाच मागितली. तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी अहमदनगर एसीबीकडे तक्रार केली.

 

एसबीच्या पथकाने 12 जानेवारी रोजी वैजापूर येथे पंचासमक्ष पडताळणी केली असता, आरोपी रामेश्वर काळे यांनी तक्रारदार यांचे कडे 50 हजार रुपये लाचेची मागणी करुन तडजोड अंती 30 हजार रुपये लाचेची मागणी करुन ही रक्कम स्विकारण्याची तयारी दर्शविल्याचे निष्पन्न झाले.
याप्रकरणी वैजापूर पोलीस ठाण्यात रामेश्वर काळे यांच्यावुरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असुनहा गुन्हा पुढील
तपासासाठी लाच लुचपत प्रतिबंधक विभाग, औरंगाबाद (Aurangabad ACB) यांचेकडे वर्ग करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर (SP Sharmistha Gharge-Walawalkar),
अपर पोलीस अधीक्षक नारायण न्याहळदे (Addl SP Narayan Nyahalde)
पोलीस उपअधीक्षक नरेंद्र पवार (DySP Narendra Pawar)
यांच्या मार्गदर्शनाखाली अहमदनगर एसीबीचे पोलीस उप अधीक्षक हरीष खेडकर (DySP Harish Khedkar),
पोलीस निरीक्षक शरद गोर्डे (Police Inspector Sharad Gorde),
पोलीस अंमलदार रमेश चौधरी, रविंद्र निमसे, बाबासाहेब कराड,चालक हारून शेख यांच्या पथकाने केली.

 

 

 

Web Title :- Ahmednagar ACB Trap | FIR by ACB against policeman who demanded Rs 50 thousand bribe

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा