Ahmednagar ACB Trap | नवीन मीटर बसवण्यासाठी लाच मागणारा वायरमन अटकेत; राजुरी तालुक्यातील प्रकार

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – Ahmednagar ACB Trap | राजुरी तालुक्यात नव्याने सुरू करण्यात आलेल्या बेकरीला व्यावसायिक वीज मीटर जोडून देण्यासाठी वायरमनने दोन हजार रुपयांची लाच मागून तोडपाणीअंती एक हजार लाच स्वीकारल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागास तक्रार देण्यात आली होती. त्यानुसार विभागाने कारवाई करत लाचखोर वायरमनला अटक केली आहे. (Ahmednagar ACB Trap)

प्राप्त माहितीनुसार, तक्रारदार यांनी राजुरी येथे नव्याने बेकरी व्यवसाय सुरू केला आहे. त्यासाठी त्यांनी व्यावसायिक मीटर मिळावा म्हणून रितसर अर्ज केला. तसेच वीजजोडणीसाठी आवश्यक असलेले नवीन विद्युत मीटरचे अधिकृत कोटेशन व शुल्क भरले. परंतु, तो मीटर बसवून देण्यासाठी आरोपी लोकसेवक धनंजय गोरख आगरे (वय 28, पद-बाह्यस्रोत वायरमन) याने दोन हजार रुपयांची मागणी केली. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागास माहिती देण्यात आली. (Ahmednagar ACB Trap)

त्यानुसार विभागाने सापळा रचून आरोपीला पंचांसमोर तोडपाणी करत रुपये एक हजार लाच स्वीकारताना अटक केली.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, अपर पोलीस अधीक्षक नारायण न्याहळदे,
वाचक पोलीस उपअधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक हरिष खेडकर,
पोलीस निरीक्षक शरद गोर्डे, महिला पोलीस नाईक राधा खेमनर, पोलीस अंमलदार बाबासाहेब कराड,
चालक पोलीस हवालदार हरुन शेख यांनी केली.

Web Title :- Ahmednagar ACB Trap | Wireman arrested for demanding bribe to install new meter; Types from Rajuri Taluka

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune ACB Trap | 2 लाखांची लाच मागून 30 हजार घेताना पुणे शहर पोलीस दलाच्या गुन्हे शाखेतील दीपक क्षीरसागरसह दोघांना अटक, पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

CM Eknath Shinde | उदयनराजे भोसलेंच्या अनुपस्थितीवर थेट बोलण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टाळले; म्हणाले…