अहमदनगर : चाकूने भोकसून युवकाच्या खुनाचा प्रयत्न

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – किरकोळ वादातून चाकूने भोसकून युवकाच्या खुनाचा प्रयत्न केला. तोफखाना परिसरातील शितलादेवी मंदिर परिसरात ही घटना घडली.

दीपक देवानंद ताडला (वय 19, दातरंगे मळा, नालेगाव) हे जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे. याप्रकरणी मोहित परदेशी (पूर्ण नाव माहीत नाही) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत माहिती अशी की, परदेशी याने ताडला यांच्या दुचाकीची चावी काढून घेतली. चावी काढल्याची विचारणा केल्याच्या रागातून मोहित परदेशी याने ताडला यांच्या पोटात चाकू खुपसून गंभीर दुखापत केली.

त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी तोफखाना पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक घायवट हे करीत आहेत. पोलिसांकडून आरोपी मोहित परदेशी याचा शोध सुरू आहे.

Visit : Policenama.com

 

You might also like