अहमदनगर : छावणी मंडळातील ‘या’ प्रभागात आरक्षण जाहीर

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – भिंगार येथील अहमदनगर छावणी परिषद पंचवार्षिक निवडणूकीसाठी महिला आरक्षणाचे प्रभाग छावणी परिषद कार्यालयात जाहीर करण्यात आले आहे. मागील वेळी प्रभाग क्रमांक १ व ५ महिलांसाठी आरक्षित होते. हे प्रभाग वगळता आता प्रभाग क्रमांक २, ३, ४ व ६ यांच्या चिठ्या टाकून ही आरक्षणाची सोडत काढण्यात आली.

छावणी परिषद निवडणूक नियमानुसार महिलांसाठी आरक्षण सुरु झाले. एकूण सात प्रभाग असलेल्या या छावणी परिषद प्रभाग क्रमांक ७ हा अनुसूचित जातीसाठी राखीव घोषित करण्यात आला आहे. महिला आरक्षण प्रभाग पध्दत सुरु झाल्यावर सर्वप्रथम प्रभाग ३ व ४ महिलांसाठी आरक्षित होते. त्यानंतरच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक १ व ५ महिलांसाठी आरक्षित झाले. आता निवडणुकीत रितसर प्रभाग क्रमांक २ व ६ हे महिलांसाठी आरक्षित असायलाच पाहिजे. मात्र छावणी परिषद वृत्तपत्रात जाहिरात देवून त्यामध्ये प्रभाग क्रमांक २, ३, ४ व ६या प्रभागांच्या चिठ्या टाकून महिला आरक्षण प्रभागाची निवड होणार असल्याचे घोषित केले होते.

चिठ्या छावणी परिषद कार्यालयामध्ये नागरिकांसमोर काढण्यात आल्या प्रभाग क्रमांक 2, 3,4व 6 या प्रभागाच्या चिठ्या करण्यात आल्या. त्यानंतर छावणी परिषदेच्या नागरिकांमधून एक ज्येष्ठ नागरिक व एक लहान मुलीच्या हाताने अशा दोन चिठ्या काढण्यात आल्या. यामध्ये प्रभाग क्रमांक 4 आणि 6 या चिठ्या निघाल्या व प्रभाग क्रमांक 4 आणि 6 हे सर्वसाधारण महिला प्रभाग घोषित करण्यात आले. व प्रभाग क्रमांक 1, 2, 3 आणि 5 हे सर्वसाधारण प्रभाग घोषित करण्यात आले. प्रभाग क्रमांक 7 अनुसूचित जाती साठी घोषित करण्यात आला.

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/