४००० लाच घेताना तहसील कार्यालयातील अव्वल कारकून अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – फेरफार नोंदीतील दुरुस्ती करण्यासाठी चार हजार रुपयांची लाच स्वीकारताना अव्वल कारकुनास रंगेहाथ पकडण्यात आले आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नगर पथकाने अकोले येथे आज दुपारी ही कारवाई केली.

निवृत्ती मारुती भालचिम (वय ४३, अव्वल कारकून, तहसील कार्यालय अकोले, रा. धुमाळवाडी, अकोले, जि. अहमदनगर) हे अटक केलेल्याचे नाव आहे. याबाबत माहिती अशी की, तक्रारदार यांनी नव्याने खरेदी केलेल्या जमिनीचे फेरफारमध्ये झालेली चुकीची नोंद दुरुस्तीसाठी लिंगदेव गावच्या तलाठ्याने तहसील कार्यालयात पाठविलेल्या महसूल जमीन अधिनियम कलम १५५ प्रमाणे प्रकरण पाठवले होते. सदर प्रकरणाचा निकाल देण्यासाठी अव्वल कारकूनाने चार हजार रुपयांची लाच मागितली होती.

याबाबत नगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयात तक्रार करण्यात आली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक शाम पवरे यांच्या नेतृत्वाखालील पोलिस पथकाने अकोले तहसील कार्यालय आवारात सापळा रचला होता तेथे तक्रारदाराकडून चार हजार रुपये स्वीकारताना अव्वल कारकुनास रंगेहाथ पकडण्यात आले. त्याच्याविरुद्ध अकोले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

हृदय निरोगी राहण्यासाठी घ्यावा ‘हा’ आहार

या फळांचे ज्यूस घेतल्याने नष्ट होतील गंभीर आजार

पावसाळ्यातील व्हायरल फीव्हरपासून असा करा बचाव

‘या’ सवयी ठरु शकतात घाताक, आरोग्याचे होते नुकसान

महिलांसाठी “योगाचे” महत्व जास्त

३ मिनिटात जाणून घ्या तुमचे हृदय किती तरुण आणि हेल्दी

सिने जगत –

‘कलंक’मुळे माझ्या करिअरला ‘कलंक’ : वरूण धवन

…म्हणून सानिया मिर्झा, वीना मलिक यांच्यात ट्विटरवर ‘जुंपली’, पुढे झालं ‘असं’