काँग्रेसच्या प्रभारी जिल्हाध्यक्षपदी साळुंखे

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – अहमदनगर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या प्रभारी अध्यक्षपदी बाळासाहेब ऊर्फ सुरेश भागवत साळुंखे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी याबाबतचे पत्र त्यांना आज दिले आहे.

तत्कालीन प्रभारी जिल्हाध्यक्ष अण्णासाहेब शेलार यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेल्या विखे यांचा प्रचार सुरू केल्याने त्यांची काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पदावरून हकालपट्टी करण्यात आली होती. त्यांच्या जागेवर युवा नेते करण ससाणे यांची राहुल गांधी यांच्या परवानगीने जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली होती. परंतु लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान ससाणे यांनी राजीनामा देऊन काँग्रेसला रामराम ठोकला व विखे यांना साथ दिली. त्यामुळे सध्या काँग्रेसचे जिल्हाध्यक्षपद पुन्हा एकदा रिक्त झाले आहे.

नियमित अध्यक्षाची नियुक्ती होईपर्यंत प्रभारी जिल्हाध्यक्ष म्हणून बाळासाहेब उर्फ सुरेश साळुंखे यांची निवड करण्यात आली आहे. साळुंखे काँग्रेस पक्षाचे कर्जत शहरातील जुने कार्यकर्ते आहेत. त्यांच्या निवडीनंतर काँग्रेसच्या कर्जतमधील कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.

Balasaheb Shinde

आरोग्यविषयक वृत्त –

पावसाळ्यात आलू बुखार आवश्य खा, यात आहेत भरपूर ‘व्हिटामिन्स’

दात पांढरेशुभ्र हवे असतील तर लिंबाचा असा करा उपयोग

वॅक्स करताना घ्या ‘या’ गोष्टींची काळजी !

‘या’ कारणामुळे फुटतो घोळाणा ; घ्या जाणून

‘नागीण’ या आजारावर ‘हे’ घरगुती उपाय !

‘या’ ५ कारणांमुळे होते ‘किडनी’ खराब, जाणून घ्या

‘मक्याचं’ कणीस खाल्यावर लगेच पाणी पिणे पडेल ‘महागात

डोकेदुखीने त्रस्त आहात का ? हे घरगुती रामबाण उपाय करा

अपचनाची समस्या अशी दूर करा, हे आहेत प्रभावी ६ घरगुती उपाय

You might also like