अहमदनगर : जुळयांना तिनं सुखरूपपणे दिला जन्म, काही तासात ‘कोरोना’बाधित महिलेचा मृत्यू

अहमदनगर : पोलिसनामा ऑनलाइन – येथील जिल्हा रुग्णालयात जुळ्या बाळांना जन्म देणाऱ्या कोरोना संसर्गित महिलेचा आज सकाळी (२९ मे) उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या महिलेने काल (२९ मे) रात्रीच एक मुलगा आणि एक मुलगी अशा जुळ्यांना जन्म दिला होता.

ही महिला मुंबईतून अहमदनगर येथील निंबलक येथे आली होती. त्यानंतर केलेल्या तपासणीमध्ये ती कोरोना संसर्गित असल्याचं स्पष्ट झालं. अहमदनगर येथील जिल्हा रुग्णालयात या महिलेची सिझेरियन प्रसूती करण्यात आली. प्रसूतीनंतर महिला आणि दोन्ही बाळांची तब्येत बरी होती. खरंतर या महिलेने बाळांना सुखरूप जन्म दिल्याने कुटुंबासह रुग्णालयात आनंदाच वातावरण होत.

परंतु, त्यांचा हा आनंद फार काळ टिकला नाही. रात्रीच उशिरा या महिलेला आयसीयूमध्ये हलवण्यात आलं होतं. या महिलेला न्यूमॅटिक लक्षण होती. मात्र, सकाळी जुळ्यांच्या जन्माच्या अवघ्या काही तासानंतरच या माऊलीने चिमुकल्यांचा निरोप घेतला. त्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, अहमदनगरमध्ये कोरोना संसर्गित रुग्णांची संख्या ११२ झाली असून, आतापर्यंत ५८ जणांना उपचारानंतर सोडून देण्यात आलं आहे. तर जिल्ह्यात एकूण ९ जणांचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like