Ahmednagar Crime | धक्कादायक ! 13 वर्षीय मुलीचा 24 वर्षीय तरुणासोबत जबरदस्तीने लग्न लावून अत्याचार

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन –  Ahmednagar Crime | अहमदनगर जिल्ह्यात एक अमानवीय कृत्य करणारी घटना घडली आहे. येथील एका 13 वर्षीय मुलीचं लग्न (बालविवाह) (Child Marriage) एका 24 वर्षीय युवकाबरोबर लावून दिल्याची धक्कादायक (Ahmednagar Crime) घटना समोर आली आहे. इतकंच नाहीतर नवऱ्या मुलानं पीडित मुलीशी शारीरिक संबंध (Sexual relation with minor wife) ठेवत तिला जिवंतपणी नरक यातना दिल्या आहेत. या प्रकरणावरुन पीडित मुलीच्या आईसह 8 जणांवर गुन्हा दाखल (FIR) झाला आहे.

याबाबत माहिती अशी, 13 वर्षीय पीडित मुलगी नेवासा (Nevasa) फाटा येथील वास्तव्यास आहे.
तीचं लग्न पीडितेची आई, मावशी आणि काकाने जबरदस्तीने एका 24 वर्षीय युवकाबरोबर लावून दिला होता. लग्नानंतर पीडित मुलगी 5 सप्टेंबरपर्यंत सासरी राहिली.
दरम्यानच्या काळात नवऱ्यासह सासरच्या कुटुंबाकडून पीडितेवर अत्याचार केला आहे.
पतीनेही तिच्यावर अनेकदा लैंगिक अत्याचार (Sexual harassment) केले आहे.
घरकाम येत नसल्यानं नवऱ्यासह सासू सासऱ्यांनी शिवीगाळ करत अनेकदा मारहाण केलीय.

दरम्यान, 5 सप्टेंबर रोजी आरोपींनी पीडितेला बाहेरची बाधा कारण देत माहेरी पाठवून दिलं आहे.
त्यामुळे माहरेच्या कुटुंबानं तिला मांत्रिकाकडे नेलं असता, त्यानेही पीडितेला मारहाण केली आहे.
यानंतर पीडित मुलगी नेवासा तालुक्यातील खडका याठिकाणी आजोबांच्या घरी आल्यानंतर या प्रकरणाचं बिंग फुटलं.
या प्रकरणाची माहिती पीडित मुलीच्या आईने आजोबांनाही दिली नव्हती.
यांनतर नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

पोलिसांनी पीडित मुलीची आई, मावशी व काकासह पती, सासू व सासरे आणि 2 मांत्रिक अशा 8 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी बालविवाह प्रतिबंधक कायदा, पोक्सो आणि जादूटोणा प्रतिबंधक कायद्याअंतर्गत या गुन्ह्याची नोंद केलीय. याप्रकरणी अधिक तपास पोलीस (Police) करत आहेत.

 

Web Title : Ahmednagar Crime | 13 years old girl child marriage with 24 years old man raped and abused in ahmednagar

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

PAK vs NZ | PM इम्रान खान सुद्धा वाचवू शकले नाहीत पाकिस्तान-न्यूझीलंड क्रिकेट सीरीज, सुरक्षेच्या कारणामुळे शेवटच्या क्षणी रद्द

Ulhasnagar Crime | घृणास्पद ! 6 वर्षाच्या चिमुकलीवर मामाकडून बलात्कार

Anil Deshmukh | अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ ! नागपुरमधील मालमत्तांवर आयकर विभागाचा छापा