Ahmednagar Crime | कॉलेजच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपला जॉइन न केल्याने विद्यार्थ्याची शिक्षिकेला शिवीगाळ

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन- संपूर्ण जगाला जेव्हा कोरोना महामारीने वेढले होते, तेव्हा लोकांचे घराबाहेर जाणे अवघड झाले होते. या महामारीमुळे विद्यार्थ्यांचेही अतोनात नुकसान झाले. पण त्यावेळी व्हॉट्सअ‍ॅपने अनेक विद्यार्थी आणि शिक्षकांची मदत केली. व्हॉट्सअ‍ॅपमुळे अनेक विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळेशी, महाविद्यालयाशी संपर्कात राहता आले. त्यानंतर आता वर्गाचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप असणे ही सामान्य गोष्ट आहे. मात्र, अशाच एका ग्रुपमध्ये जॉइन करून न घेतल्यामुळे एका विद्यार्थ्याने शिक्षिकेला शिवीगाळ केली.

अहमदनगरमध्ये (Ahmednagar Crime) सावेडी उपनगरातील पाइपलाइन रोड परिसरातील एका कॉलेजमधील ही घटना असून, या कॉलेजमधील एसवायबीएमध्ये शिकणाऱ्या मुस्तफा नावाच्या विद्यार्थ्याने, त्याला कॉलेजच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपला जॉइन का करून घेत नाही, अशी विचारणा करत एका शिक्षिकेला शिवीगाळ केली. तसेच, शिक्षिकेच्या भावाला धक्काबुक्की केली. या प्रकरणी विद्यार्थी मुस्तफा खानसह त्याच्या दोन सहकाऱ्यांविरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

कॉलेजमधील बऱ्याच सूचना एका व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर दिल्या जातात. त्यानुसार परीक्षेची सूचना देण्यात आली होती.
गुरुवारी एसवायबीएमध्ये शिकणाऱ्या मुस्तफाचा या शिक्षेकाला फोन आला. ऐनवेळी पेपरची माहिती मिळाल्यावर येता येऊ शकत नाही. मला व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपला का जॉइन करून घेत नाही? असे त्यांनी त्यांना विचारले. त्यावर शिक्षिकेने नियमित कॉलेजला येत जा, तसेच सोमवारी येऊन पेपर दे, असे सांगितले.

यानंतर मुस्तफा त्या दुपारीच कॉलेजला आला आणि वर्गात बसला.
आलेल्या फोनबद्दल शिक्षिकेने प्राचार्यांना सांगितले. त्यानंतर प्राचार्य स्वतः वर्गात आले,
त्यांनी मुस्तफाला शिस्त पाळण्यास सांगत वर्गाबाहेर काढले. यावर मुस्तफा तिथून निघून गेला.
हा प्रकार शिक्षिकेच्या घरी कळल्याने त्यांचा भाऊ शिक्षिकेला घेण्यासाठी कॉलेजमध्ये आला.
तेव्हा मुस्तफा खान व त्याच्या सोबतच्या तीन अनोळखी व्यक्तींनी दोघांना अडविले.
शिक्षिकेला शिवीगाळ करीत भावालाही धक्काबुक्की केली आणि जिवे मारण्याची धमकी दिली.

Web Title :-  Ahmednagar Crime | ahmednagar student allegedly abuses teacher her brother for not adding into college whatsapp group maharashtra crime news

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sulochana Chavan Passed Away | लावणीसम्राज्ञी ज्येष्ठ पार्श्वगायिका सुलोचना चव्हाण यांचे निधन; 92 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

CM Eknath Shinde | फडणवीसांच्या ड्रायव्हिंगची दखल नरेंद्र मोदींनी घेतली; एकनाथ शिंदेंनी दिली माहिती