Ahmednagar Crime | सासरा सुनेवर घ्यायचा भलताच संशय, सुनेनं भररस्त्यात केलं भयानक कृत्य; नगर जिल्ह्यात प्रचंड खळबळ

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – Ahmednagar Crime | अहमदनगर जिल्ह्यातील (Ahmednagar Crime) जामखेड रोडवरील चिंचोडी गावात घडलेल्या घटनेमुळे संपुर्ण जिल्हा हादरुन गेला आहे. याठिकाणी एका महिलेने भररस्त्यात आपल्या सासऱ्यावर कुऱ्हाडीने सपासप (Attack with ax) वार करून निर्घृण खून (daughter in law killed father in law) केला. एवढ्यावरच ती थांबली नाही तर तिने सासऱ्याचं डोकं दगडाने (Crushed head with stone) ठेचले. ही घटना मंगळवारी (दि.23) सकाळी घडली असून या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपी सुनेला अटक केली आहे.

 

अर्जुन गोविंद हजारे (वय-63) असे खून झालेल्या सासऱ्याचं नाव असून ते जामखेड रस्त्यावरील चिंचोडी पाटील गावातील रहिवासी होते. याप्रकरणी पोलिसांनी सून ज्योती अतुल हजारे हिला अटक (Arrest) केली असून तिच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत अर्जुन हे आपल्या सुनेच्या चारित्र्यावर वारंवार संशय (Doubt over character) घेत होते. त्यामुळे सासरच्या मंडळी सोबत आरोपी ज्योती हिचे वारंवार वाद होत होते.

 

 

मंगळवारी सकाळी याच कारणावरून दोघांमध्ये वाद झाले होते. सासऱ्याने चारित्र्याचा संशय घेतल्याने दोघंही गावातील रस्त्यावर एकमेकांसोबत भांडत होते.
भररस्त्यात सुरू असलेल्या वादातून संतापलेल्या सुनेनं सासऱ्यावर कुऱ्हाडीने सपासप वार केले.
ती एवढ्यावरच थांबली नाही तर तिने रस्त्याच्या बाजूला पडलेला दगड सासऱ्याच्या तोंडावर, डोक्यात आणि कपाळावर एका पाठोपाठ एक घाव घातले. (Ahmednagar Crime)

 

हा हल्ला एवढा भयावह होता की, सासरे अर्जुन हजारे यांचा जागेवर तडफडून मृत्यू (Ahmednagar Crime) झाला.
घटनेची माहिती मिळताच नगर तालुका पोलिसांनी (Nagar taluka police) घटनास्थळी धाव घेतली.
त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन आरोपी सुनेला घटनास्थळावरुनच अटक केली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

 

Web Title :- Ahmednagar Crime | daughter in law killed father in law attack crushed head with stone in Ahmednagar

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा