Ahmednagar Crime | मंत्री शंकरराव गडाख यांच्या स्वीय सहायकावर गोळीबार, प्रचंड खळबळ

अहमदनगर / नेवासा : Ahmednagar Crime | राज्याचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख (Maharashtra Minister Shankarrao Gadakh) यांचे स्वीय सहायक राहुल राजळे (Rahul Rajale) यांच्यावर 3 ते 4 हल्लेखोरांनी गोळीबार करुन त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न (Attempt To Kill) केला. राहुल राजळे यांना 3 गोळ्या लागल्या (Ahmednagar Crime) असून त्यांच्यावर अहमदनगरमधील खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. ही घटना नेवासा (Nevasa) तालुक्यात शुक्रवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास घडली. (Firing On Rahul Rajale PA Of Maharashtra Minister Shankarrao Gadakh In Nevasa Taluka Of Ahmednagar)

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, राहुल राजळे एका यात्रेत सहभागी झाले होते. तेथून ते रात्री ९ वाजण्याच्या सुमारास लोहगाव येथे आले. हल्लेखोर आधीच दबा धरुन बसले होते. त्यांनी राहुल यांच्यावर एका पाठोपाठ पाच गोळ्या झाडल्या. राजळे यांच्या कमरेखाली एक व डाव्या पायाला एक गोळी लागली आहे. (Ahmednagar Crime)

डाव्या हाताला एक गोळी चाटून गेली आहे. त्यानंतर हल्लेखोर पळून गेले. जखमी अवस्थेत राजळे यांना रात्रीच अहमदनगरमधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्यांच्यावर मध्यरात्री शस्त्रक्रिया करण्यात आली असून त्यांची प्रकृती सुधारत आहे. हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी रात्रीपासून नाकाबंदी करण्यात आली आहे.

 

Web Title : ahmednagar crime firing on rahul rajale pa of maharashtra minister shankarrao gadakh in nevasa taluka of ahmednagar

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा